आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • If There Is Determination To Learn, There Is No Age Limit For Education. Tatya Rao Lahan's Statement, Family Physician Association Will Conduct 100 Student Examination

शिक्षणाला वयाचे बंधन नसते:डाॅ. तात्याराव लहानेंचे वक्तव्य, 'फिजीशियन' संघटना करणार 100 विद्यार्थ्यांची तपासणी

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''शिकण्याची इच्छा आणि आवड असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते.'' असे मत पद्मश्री. डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले. डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यानाअंतर्गत त्यांनी फॅमिली डॉक्टर चे समाजातील स्थान व महत्व अधोरेखित केले.

फॅमिली फिजिशियन संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या आराेग्य संवर्धनाच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात येणार आहे. संघटनेच्या वतीने 100 विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी करत त्यांना औषधाेपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. याच बराेबर डाॅक्टर व रुग्णांचा संवाद वाढविण्यासाठी देखील संस्थेच्याव वतीने विविध उपक्रम राबविले जाणार आहे.

फॅमिली फिजीशियन संघटना अर्थात एफ. पी. ए या संस्थेचा नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा,सुसंवाद स्मरणिका प्रकाशन सोहळा, डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्यान व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थित पार पडला.

यावेळी नुतन अध्यक्ष डॉ. विनय मोगल यांनी मावळते अध्यक्ष डॉ.पंकज देवरे यांच्या कडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. डॉ. मनिष पवार व डॉ. तेजस्विनी सोलोमन यांनी सूत्रसंचलन केले. माजी अध्यक्ष डॉ. सुनील जगताप सरांनी नुतन कार्यकारिणीची घोषणा केली. डॉ. सुनंदा मुंदडा यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.

डॉ रूपेश मर्दा यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याची जबाबदारी पार पाडली.डॉ. ज्योती पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष, निवड समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, सभासद व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते

अशी आहे नवीन कार्यकारिणी

डॉ. शीतल सुरजुसे यांनी सचिव पदाचा व डॉ. विजय मुंदडा यांनी खजिनदार पदाचा पदभार स्वीकारला.तसेच उपाध्यक्ष डॉ. तेजस्विनी सोलोमन, सहसचिव डॉ. अविनाश पवार, सुसंवाद संपादक डॉ. मनिष पवार, सहसंपादक डॉ. मंजुषा व्यवहारे, संघटक डॉ. रूपेश मर्दा व डॉ.ज्योती पाटील, कार्यकारिणी सदस्य डॉ. अनुपमा मराठे, डॉ. सुनंदा मुंदडा, डॉ. मनिषा मर्दा, डॉ. प्रियांका बेंडाळे यांनी पदभार स्वीकारला.

डॉ. वसंतराव गुप्ते स्मृती व्याख्याना अंतर्गत पद्मश्री. डॉ तात्याराव लहाने यांनी फॅमिली डॉक्टर चे समाजातील स्थान व महत्व अधोरेखित केले. शिकण्याची इच्छा आणि आवड असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते असेही ते म्हणाले. टाळ्यांचे विविध प्रकार सांगून त्यामागील विज्ञान सर्वांना स्पष्ट केले.

भाषा कोणतीही असली तरी ती सर्वसामान्यांना समजली पाहिजे. आपल्या कामाप्रती निष्ठा आणि तळमळ असावी तसेच संघटनाचे महत्व देखील त्यांनी सांगितले. तसेच सीमाताई हिरे यांनी आपसातील हेवेदावे विसरून सर्व वैद्यकीय बांधवांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे याविषयी उपस्थितांना संबोधित केले.

बातम्या आणखी आहेत...