आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:देखाव्यांमागील हे पाइप ढासळले तर..! त्याला जबाबदार काेण? ; गणेश मंडळांचा संतप्त सवाल

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशाेत्सवात केंद्रस्थानी असलेल्या बी. डी. भालेकर मैदानात पडलेले साहित्य स्मार्ट सिटी कंपनीने उचलण्यास ठाम नकार दिला आहे. मात्र, विविध कंपन्यांच्या मंडळांनी तेथे देखावे उभारण्याचे काम सुरू केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने या देखाव्यांच्या मागेच पाइप एकावर एक रचून जागा माेकळी करण्याचा दिखावा केला. मात्र, हेच पाइप काेसळून काही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार काेण? असा सवाल गणेश मंडळे विचारत आहेत.

..तर स्मार्ट सिटीचे अधिकारी जबाबदार
भालेकर मैदानावरील अद्याप पाइप हटविण्यात आलेले नाही. गणेशाेत्सवात या ठिकाणी गर्दी हाेत असतेे. जर या पाइपामुळे काही अपघात घडल्यास त्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार ठरवणार.
- समीर शेटे, अध्यक्ष, गणेश महामंडळ, नाशिक

बातम्या आणखी आहेत...