आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राठी स्मृतिदिन:विवेकानंदांच्या विचारांची कास धरल्यास भारत विश्वगुरू होईल; पद्मश्री निवेदिता भिडे यांचे प्रतिपादन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांत मोठी ताकद असून, त्याची कास धरल्यास भारत निश्चितच विश्वगुरू बनेल,असा विश्वास पद्मश्री पुरस्कार विजेत्या आणि कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी व्यक्त केला.

नाशकात उद्यमनगरीची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री कै. बाबूभाई राठी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा), नाईस आणि लघुउद्योग भारती यांच्यावतीने भिडे यांच्याशी सुसंवाद आणि त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी,नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, आयामाचे बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बूब, लघुउद्योग भारतीचे सरचिटणीस निखिल तापडिया, निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे, विवेकानंद केंद्र(नाशिक)चे सहसंचालक विष्णू शेजवळकर आदी होते.

भिडे म्हणाल्या की, भारताची संस्कृती महान आहे. येथे विविध जाती, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. भारताला एकसंघ ठेवण्याचे, आपली मौल्यवान जीवनमूल्ये टिकविण्याचे तसेच कोणत्याही संकटावर मात करण्याचे सामर्थ्य स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीतच आहे.

नाशिक ही आधी मंत्रभूमी होती. परंतु नंतर ती तंत्रभूमी बनली आणि हे स्वप्न साकार झाले ते पद्मश्री कै. बाबूभाई राठी यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे,असे गौरवोद्गार आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. आज मुंबई, पुण्यानंतर नाशिक हेच उद्योगवाढीचे राज्यातील एकमेव महत्वपूर्ण डेस्टिनेशन आहे. नाशकात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक येत आहे. लवकरच नाशिक हे आयटी हब बनणार आहे आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी ज्यांच्यामुळे शक्य झाल्या त्या सर्वांचे स्मरण करणे करणे आमचे आद्यकर्तव्य आहे, असे नमूद करून पांचाळ यांनी राठी यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमास माजी अध्यक्ष जे. एम. पवार, धनंजय बेळे,राजेंद्र अहिरे,आयपीपी वरुण तलवार, दीपक राठी जयप्रकाश राठी, अण्णासाहेब देशमुख, विवेकानंद केंद्र देवगिरीचे संचालक विश्वास देवकर आदी उपस्थित होते. रमेश वैश्य यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...