आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:इगतपुरी ग्रामीण साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये नाशकात

घोटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली. दोनदिवसीय साहित्य संमेलन नाशिकच्या मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.

साहित्य संमेलन सहा सत्रात होणार असून ग्रंथदिंडी, उद्घाटन, कविसंमेलन, व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार वितरण, कथाकथन, खुले कविसंमेलन असे भरगच्च कार्यकम होणार अाहे. साहित्यिकांनी या साहित्य संमेलनात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. या अगोदर इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने २२ ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुक्यातील विविध भागात भरवून अनेक नवसहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे. यातून प्रेरणा घेऊन अनेक साहित्यिक साहित्याची परंपरा जोपासत आहे. या संमेलनात राज्यातील मान्यवर साहित्यिकांचा सहभाग असतो. साहित्य संमेलनाची माहिती अॅड. ज्ञानेश्वर गुळवे, बाळासाहेब पलटणे, मानवधनचे प्रकाश कोल्हे, दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...