आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलनाची तयारी:उघड्या डीपींकडे दुर्लक्ष

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पथदीपांच्या इलेक्ट्रिक सर्किट बॉक्सची तुटलेली झाकणे, लोंबणाऱ्या वायर्स, कित्येक डीपींना झाकणेच नाहीत, खांबांवर वेलींचा विळखा यामुळे विद्युत नेहमीच खंडित हाेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने पंचवटीसह मध्य नाशिकमधील नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. शहरातील विविध भागांत असणारी महावितरणच्या डीपी उघड्याच असून त्यावर वेलींचा विळखा आहे तर झाडांच्या फांद्याही वायर्समध्ये शिरल्या आहेत. शालिमारसह तपोवन, गंगापूरराेड, सातपूर, पुणेरोड, पखालरोडसह तपोवन भागातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ तसेच, पंचवटी कॉलेजसमोरील या परिसरात हे चित्र दिसते.

बातम्या आणखी आहेत...