आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘इक्षणा ट्रेझर हंट’ या उपक्रमास प्रारंभ झाला आहे. सर्व आरोग्य विद्याशाखांच्या इतिहास आणि युवांच्या भविष्याचा वेध याद्वारे घेता येईल. याशिवाय विद्यार्थी-शिक्षकांसाठी उपयुक्त अशा विद्याशाखांची माहिती, पत्रके, छायाचित्र, औषधे, विद्याशाखांचा इतिहास, संशोधन आणि विकासाचे दस्तऐवजीकरण प्रदर्शितसाठी हा अभिनव उपक्रम आहे. शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागतांनी वैयक्तिक व महाविद्यालयात विभागप्रमुखांच्या परवानगीने अनेक दशकांपासून अस्पर्शित, विशेषतः वेअर हाउस, स्टोअररुम, कॉलेजच्या जुन्या इमारतींमधील मोकळया जागा इत्यादी ठिकाणी छाननी करून वस्तूंचे दस्तऐवजीकरण करावे, असे आवाहन कुलगुरू डाॅ. माधुरी कानिटकर यांनी केले आहे.
वापरात नसलेल्या जुन्या वस्तू, दस्तावेज, कलाकृती पाठवा विद्यापीठ आवारातील वस्तुसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत असून यासाठी आपल्या संग्रहातील आरोग्यशास्त्राशी संबंधित महत्त्वपूर्ण वस्तू, कलाकृतींचे संकलन ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रमाद्वारे संग्रहित आणि प्रदर्शित करण्यात येणार आहे. वापरात नसलेल्या जुन्या वस्तू, दस्तावेज, कलाकृतींचे छायाचित्र काढून शीर्षक व अनुक्रमांकासह विद्यापीठास muhsmuseum@muhs.ac.in इ-मेलद्वारे विद्यापीठाकडे दि. २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवाव्यात. वस्तूंची निवड झाल्यास कळविण्यात येईल. त्यासाठी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२५३-२५३९१७६ क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.