आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात सत्तातंरानंतर प्रथमच नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी माेठ्या संख्येने अनधिकृत होर्डींग्ज लावले आहे. शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या या अवैध होर्डींग्जने पोलिस व मनपा यंत्रणेलाच आव्हान दिले आहे.
कारवाईकडे लक्ष
विशेष म्हणजे, अवैध होर्डिंग्जविरोधात उच्च न्यायालयाने थेट कारवाईचे आदेश दिल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वतंत्र आदेश काढून थेट कारवाई करत शहर होर्डीग्जमुक्त केले होते. मात्र, आता या विद्रुपीकरणावर नूतन पोलिस आयुक्त नेमके कोणाकोणावर गुन्हे दाखल करणार, याकडे आता लक्ष आहे. याबाबत पोलिस आयुक्त जंयत नाईकनवरे यांन सांगितले की, शहरात अैवध होर्डींग्ज लागले असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. होर्डिंग्जसाठी परवानगी घेतली नसेल तर गुन्हे दाखल केले जातील. कोणाचीही गय केली जाणार नाही. तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द केलेले नाही.
ठिकठिकाणी होर्डिंग्ज
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे प्रथमच शुक्रवारी नाशिक दाैऱ्यावर आले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी जाेरदार स्वागतासाठी तयारी केली. पाथर्डी फाट्यापासून ते महामार्गावरील उड्डाणूलाखाली ठिकठिकाणी होर्डींग्जं लावले. मुंबई नाक्यावर तर थेट पोलिस ठाण्याच्या समाेरच वाहतूक बेटावर माेठे फलक लावून जणू पोलिसांनीच स्वागत फलक उभारलेचे चित्र दिसून येत आहे. या होर्डींग्जमुळे वाहतूकीला देखील अडथळा ठरत आहेत. तरीही वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मनपा अतिक्रमण विभाागनेदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यचे दिसून आले. द्वारका चौकात, सारडा सर्कल, आडगाव नाका अशा सर्वच ठिकाणी माेठमाेठ्या कमानी व होर्डींग्ज लावले आहेत.
पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा विसर
तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनीही २० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई पोालिस अधिनियमानुसार परिपत्रक काढले. राजकीय भाऊ, दादा, अण्णा अशा नेत्यांना चपराक देत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले होते. त्याची कठाेर अंमलबजावणी झाल्याने शहर खरोखरच होर्डीग्ज मुक्त झाले होते. मात्र, त्यांची बदली होताच शहरात पुन्हा अवैध होर्डग्ज चौकाचौकात दिसू लागले आहेत.
काय आहे आदेशातील तरतूदी
- आयुक्तालयाच्या हद्दीत कुठलेही समारंभ, वाढदिवस, नेत्यांचे स्वागत असो की धार्मिक, दशक्रियाविधी, फलकांना परवानगी आवश्यक - स्वतंत्र पोलिस कक्षात फलकावरील मजकूरदेखील तपासून घेणे बंधनकारक
- विनापरवानगी होर्डीग्ज लावल्यास त्यावरील नावे, छायाचित्रानुसार थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई
- शिक्षेची तरतूद : कमीत कमी चार महिने तर जास्तीत जास्त एक वर्ष सधी कैद व दंडात्मक कारवाईची तरतूद
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.