आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आशेवाडी शिवारात‎ साडेचार लाखांचा‎ अवैध मद्यसाठा जप्त‎

दिंडोरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎नाशिक-पेठ रस्त्यावरील‎ आशेवाडी शिवारात अवैध‎ मद्यसाठ्याची वाहतूक करणारा‎ आयशर ट्रक गुप्त माहितीच्या‎ आधारे विशेष पथकाने पकडला.‎ यात १४ लाख ६९ हजार ७२०‎ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात‎ आला आहे. पेठ रोडवर आशेवाडी‎ शिवारात अवैध मद्यसाठ्याची‎ वाहतूक केली जात असल्याची‎ माहिती प्राप्त झाली. त्यानुसार‎ पथकाचे पोलिस निरीक्षक हेमंत‎ सहायक, उपनिरीक्षक संजीव‎ पाटील, शिवाजी ठोंबरे, वसंत‎ खांडवी, प्रकाश तुपलोंढे, उदय‎ पाठक, गोरख पवार, गौरव सोनवणे‎ या पथकाने सापळा रचला.‎

पथकास आयशर संशयास्पद‎ स्थितीत दिसल्याने वाहनाची‎ तपासणी केली. यावेळी विशाल‎ साळबा आंधळे ( ३३, रा.‎ मोरवाडी, सिडको, नाशिक) याला‎ ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ४‎ लाख ६९ हजार ७२० रुपये‎ किमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा‎ व ट्रक जप्त केला. बेकायदेशीर‎ मद्याची वाहतूक करताना‎ आढळल्याने दिंडोरी पोलिसात‎ गुन्हा दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...