आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:जेलच्या पाकिटातील 12 लाखांचे अवैध मद्य जप्त

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर येथील एका मद्य तस्कराकडील टेम्पोत १२ प्लास्टिकच्या ड्रममध्ये साबण बनवण्याच्या जेलीच्या पाकिटातील १२ लाखांचे अवैध मद्य ताब्यात घेण्यात आले. दादरा व नगर हवेली निर्मित १९२० मद्याच्या बाटल्या वाहतूक करताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडल्या. पथकाने कसबे वणी गावात एका हाॅटेलसमोर ही कारवाई केली.

माहितीनुसार, कळवण विभागाच्या पथकाला टेम्पोमधून मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पथकाने वणी दिंडोरी रोडवर सापळा रचला. संशयित टेम्पोला (एमएच ४८ एवाय २९३५) थांबवले. वाहनाची तपासणी केली असता टेम्पोमध्ये १२ प्लास्टिकचे सीलबंद ड्रम आढळून आले. वाहन चालक संशयित दीनानाथ सीताराम पाल (रा. पालघर) यास विचारणा केली असता त्याने ड्रममध्ये साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या एसएलईएस जेलची कागदपत्र दाखवले. सुरवातीला ड्रममध्ये खरोखर जेल असावी, असे पथकाच्या अधिकाऱ्यांना वाटले. एक ड्रम खोलण्यास सांगितले असता चालकाने नकार दिला. त्यानंतर ड्रमचे सील तोडले असता जेलीच्या पाऊचमध्ये मद्याच्या बाटल्या असल्याचे आढळले.

बातम्या आणखी आहेत...