आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावकराकडून १० टक्के व्याजाने घेतलेल्या कर्जामुळे मागील महिन्यात एका दांपत्याने तर दाेन दिवसांपूर्वी सातपूर येथील वडील आणि दाेन मुलांनी केलेल्या आत्महत्येमुळे अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे. सावकारीचा परवाना देणाऱ्या जिल्हा उपनिबंधकांकडे या वर्षभरात अवैध सावकारांच्या विराेधात केवळ ८ तक्रारी दाखल झाल्या असून त्यातही तीन प्रकरणांत तक्रारदारांनीच तक्रार मागे घेतली आहे तर अवैध सावकारीब ाबतच्या चार तक्रारींबाबत या महिन्यात निर्णय हाेणार आहे.
विशेष म्हणजे, फक्त एका प्रकरणात परवानाधारी सावकाराने हडपलेली मालमत्ता शेतकऱ्याला परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार यापूर्वी आपण अनुभवले आहेत. मात्र नाशिक शहरासह जिल्ह्यातही अवैध सावकारीची पाळेमुुळे घट्ट राेवली असून याचे चटके सामान्यांना बसू लागले आहेत. अवैध सावकारीमुळे घ डलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हा विषय चर्चेत आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्ह्यातील २७० पैकी २५० सावकारांचे परवाने वर्षभरात नियमित केले आहेत.
पाेलिसात तक्रार करा
अनधिकृत सावकार वसुलीसाठी तगादा लावत असल्यास संबंधित पाेलिस ठा ण्यात अथवा पाेलसांच्या ्आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे नागरिकांनी कागदपत्रांसह तक्रार करावी, याबाबत शहानिशा करून संबंधित सावकारांवर पाेलिसांकडून कारवाई केली जाईल. - अंकुश शिंदे, पाेलिस आयुक्त
महादेववाडीत छापा
दरम्यान , अवैध सावकारीचा प्रश्न एेरणीवर आल्याने सातपूर येथे महादेववाडीमध्ये मंगळवारी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. अवैध सावकारीच्या संदर्भातील तक्रारीतून हा छापा टाकण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लाेकांनी तक्रारीसाठी पुढे यावे
सावकाराने मालमत्ता हडप केली असेल किंवा मालमत्तेचे व्यवहार केले असतील, अवैध सावकारी केली जात असेल तर लाेकांनी पुढे येऊन याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करावी. ज्यांना सावकारीचा परवाना हवा असेल त्यांनीही त्याकरता अर्ज दाखल करावा. यारवर कारवाई केली जाईल. -डाॅ. सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.