आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक जप्त:17 लाखांचा अवैध पान मसाला जप्त ; अन्न व प्रशासन विभागाची महामार्गावर कारवाई

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधून अवैध पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा नेला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त होताच मंळवारी (दि. २०) रात्री उशिरा महामार्गावर गरवारे चौक येथे हा ट्रक (एमएच १८ बीजी ४०४४) अडवून पथकाने सुमारे १७ लाखांचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला.

अन्न व आैषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईनंतर ट्रकचालक व माल अंबड पोलिस ठाण्यात आणण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऊ. सि. लोहकरे, सहायक आयुक्त विवेक पाटील, प्रमोद पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गोपाळ कासार, अविनाश दाभाडे, विकास विसपुते, नमुना सहायक अधिकारी निवृत्ती साबळे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...