आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध विक्री:दुर्मिळ कासवांची अवैध विक्री; वनविभागाकडून विक्रेता ताब्यात

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी भारतीय प्रजातीतील कासवाची अवैध विक्री करणाऱ्याला गुरुवारी (दि. २२) ताब्यात घेतले आहे. नाशिक वनविभागाच्या पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक वनसरंक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी महामार्ग बसस्थानकाच्या समोर असलेल्या बुरहानी फिश अॅक्वेरियम येथे जाऊन झडती घेतली. तेव्हा त्यांना एक इंडियन टेंट कासव सापडले.

हे कासव भारतीय (वन्यजीव) अधिनियम १९७२चे अनुसूची १ मध्ये समाविष्ट व संरक्षित असल्याने त्याची अवैध विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कासव जप्त करून संशयित आरोपी खोजेमा असगरअली तिन्वाला याला अटक केली आहे. यावेळी अनिल अहिरराव, उत्तम पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, हिनाली सोनवणे, रुबिना पठाण, किशोरी सानप, इको इको या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य वैभव भोगले, अभिजित महाले, सुनील खानझोडे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...