आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आयमा इंडेक्स प्रदर्शन आजपासून ; उद्योजकांसोबतच उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठी पर्वणी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भविष्याचा वेध घेणाऱ्या तसेच नवोदित उद्योजकांच्या नावीन्यपूर्ण कलाविष्काराला प्रोत्साहन देणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित आयमा इंडेक्स २०२२ हे चार दिवसांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन शुक्रवार दि. १८ मार्चपासून जनतेसाठी खुले होणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते तसेच जिंदाल सॉचे अध्यक्ष दिनेशचन्द्र सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, ग्रीनबेस आणि हिरानंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. मैती आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वाजता होत आहे. पर्यावरणपूरक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल्स ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये आहेत. उद्योग क्षेत्रात पाऊल टाकून आपली उन्नती साधावी आणि देशाला परकीय चलन मिळवून द्यावे अशी उदयोन्मुख उद्योजकांची मनीषा असते. मात्र त्यांना त्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत नसल्याने ते हताश होतात आणि आपले स्वप्न साकार होणार किंवा नाही याची चिंता त्यांना सतावत असते. परंतु उद्योगक्षेत्राशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी चारही दिवस प्रदर्शनस्थळी हजर राहून उद्योजक आणि विशेषतः नवोदितांना मार्गदर्शन करणार आहे.

वित्तसहाय्य आणि अनुदानाबाबतही त्यांना बहुमूल्य माहिती यावेळी उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवादही होणार असून सर्वांसाठी एकप्रकारे ती मेजवानीच ठरणार असल्याचे प्रदर्शनाचे चेअरमन धनंजय बेळे आणि संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केले.

आयमाचे सहावे प्रदर्शन
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) ही संपूर्ण जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करते.या संघटनेचे गेल्या तीस वर्षापासून उत्कृष्ट कार्य सुरू आहे.कामगारांचे हित जोपासण्याबरोबरच उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम संघटनेतर्फे केले जाते.उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे तसेच गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या उद्देशाने २००५ पासून आयमातर्फे दर तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते यावर्षी होत असलेले आयमा इंडेक्स हे सहावे प्रदर्शन आहे आयमाचे जिल्ह्यात २५०० हून अधिक सदस्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...