आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएरव्ही रुग्णांच्या सेवेसाठी अहाेरात्र धावपळ करणारे, शस्त्रक्रिया अन् उपचार यात नेहमीच व्यस्त असलेल्या डाॅक्टरांनी सादर केलेली लावणी, बाॅलीवूड थीमवर केलेले नृत्य अन रॅम्पवाॅकला उपस्थितांची मिळालेली टाळ्याची अन् शिष्याची दाद अशा उत्साहासाच्या वातावरणात आयएमएच्या वतीने आयाेजित आयएमए किंग आणि बादशहा ग्रॅण्ड फायनल व लव यु जिंदगी हा मनोरंजनात्मक सोहळा रंगला.
इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधत आयोजित लव यु जिंदगी हा मनोरंजनात्मक नंदनवन लॉन्स येथे उत्साहात पार पडला. कर्तृत्ववान डॉक्टर्सचे व्यक्तीमत्व, नृत्यासह विवध कलांचे दर्शन, प्रश्न उत्तरांची हजरजबाबी अशा विविध स्पर्धा या निमित्त पार पडल्या. या स्पर्धेत शहरातील200 डाॅक्टर सहभागी झाले हाेते.
लव यु जिंदगी या कार्यक्रमांतर्गत डॉक्टरांनी आपल्या नृत्य कलेचे सादरीकरण केले. यामध्ये लावणी, ब्लॅक ऍण्ड व्हाईट, ईरा, साऊथ इंडियन, ड्युएट, मॉश, अपस अशा वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत नृत्य सादर केले. आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील व सचिव डॉ. विशाल पवार यांनी आपल्या सहकार्यांसोबत रॅम्प वॉक करत कार्यक्रमाची शान वाढविली. विविध फेऱ्यामधील निकषांवर आधारीत मान्यवर परिक्षकांनी निकाल दिले. या स्पर्धेत विशेष पाेलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल, मराठी अभिनेत्री उमा पेंढारकर, दिग्दर्शक सचिन शिंदे अणि माजी आयएमए अध्यक्ष डॉ. निवेदिता पवार यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.या मनमोहक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले
आयएमए बादशहा स्पर्धेचे डाॅ. राजेंद्र नेहते विजेते
आयएमए बादशहा स्पर्धेत बाजी मारली तर डाॅ. राजेंद्र नेहते यांनी. तर या गटातील द्वितीय पारितोषिक डॉ. सुशील आहिरे तर तृतीय पारितोषिक डॉ. संजय धुर्जंड यांनी पटकावले.
किंग स्पर्धेचे विजेते ठरले डाॅ. वापीवाला
आयएमएम किंग स्पर्धेचे प्रथम पारितोषिक डॉ. अब्दुल वापीवाला, द्वितीय पारितोषिक डॉ. शरद देशमुख तर तृतीय पारितोषीक डॉ. सागर काकतर यांनी मिळविळा कार्यक्रमास डॉक्टरांचं मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.