आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंत सदगुरू रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती भा.ज.पा. प्रणीत श्री प्रतिष्ठान,कै.धर्मराज बडोदे बहुउद्देशीय संस्था व अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार यांच्या वतीने शिव काॅलनीतील संत राेहिदास अभ्यासिकेत साजरी झाली. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समरस्ता विभागाचे ज्येष्ठ समन्वयक डॉ. चंद्रशेखर पाठक हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून संत रविदास मार्ग परिवाराचे अध्यक्ष अशोक आहिरे, ज्येष्ठ सल्लागार हिरामण नांदगावकर, माई बुचके, ठाकुर काका,दादाजी अहिरे, विश्वास जोगळे, विलास गांगुर्डे, किरण जाधव, बाळकृष्ण ठाकरे, नरेंद्र भागवत, रमेश पाथरे, भारतीताई अहिरे होते. प्रमुख वक्ते डॉ. चंद्रशेखर पाठक, अशोक आहीरे, आशिष दाभोळकर, प्रवीण जाधव यांनी संत रविदास महाराज यांच्याविषयी माहिती दिली तसेच त्यांची शिकवण व महात्म्य वर्णन केले.
यावेळी आखिल भारतीय रविदास मार्ग दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विशाल बडोदे, राम बडोदे, अजय बडोदे,उदय बडोदे, अमोल बडोदे नंदलाल सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश सोनवणे, शरद पवार, सुजित मोरे, शुभम पारवे यांनी प्रयत्न केले केले. सूत्रसंचालन केदारनाथ बडोदे यांनी केले तर आभार राम बडोदे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.