आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरार डाॅक्टर:फरार डाॅक्टर व पोलिसांना तत्काळ शाेधा

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घाेटाळ्यातील संशयितांची अंतरिम जामिनाची मुदत संपताच अटक केली जाणार आहे. तसेच गुन्ह्यातील फरार डाॅक्टर, पोलिस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे सक्त आदेश दिल्याचेे पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ग्रामीण पोलिसांना आंतरजिल्हा बदलीसाठी नातेवाइकांचे गंभीर आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र देताना अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात तालुका पोलिस ठाण्यात तत्कालीन सिव्हिल सर्जन डाॅ. निखिल सैंदाणे, डाॅ. किशोर श्रीवास, लिपिक किशोर गांगुर्डे, दोन खासगी डाॅक्टर, वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, लिफ्टमॅन कांतिलाल गांगुर्डे आणि २० पोलिसांवर गुन्हा दाखल आहेत. गांगुर्डे आणि कनोज हे ताब्यात आहेत तर डाॅ. श्रीवास यांना दि. १४ पर्यंत अंतरिम जामीन आहे. तर डाॅ. सैंदाणे यांच्या अर्जावर याच दिवशी सुनावणी होत आहे. लिपिक पगारे यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...