आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम ठप्प:महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कामकाजावर परिणाम; मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील २२ हजार महसूल कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील ४९१ कर्मचारी संपावर होते. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने जिल्हाभरात तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागले.

दरम्यान, शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी २३ मार्चपासून साखळी आंदोलन सुरू केले आहे. त्या अंतर्गत जेवणाच्या सुटीत निदर्शने, घंटानादासह काळ्या फिती लावून कामकाज केले. मात्र, तरीही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने कर्मचाऱ्यांनी गेल्या सोमवारी (दि. २८) एकदिवसीय संप पुकारला होता. कर्मचारी भवन येथे निदर्शने करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी हजर, कर्मचारी सुटीवर असे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि. ४) बेमुदत संप पुकारला आहे.

दखल न घेतल्याने बेमुदत संप
वेळोवेळी शासनाकडे आम्ही मागण्या करत आहोत. मात्र, या मागण्यांकडे शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आम्ही घंटानाद, एक दिवसाचा लाक्षणिक संप करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचीदेखील दखल घेतली न गेल्याने बेमुदत संप करत आहोत.
- नरेंद्र जगताप, सरचिटणीस, महसूल कर्मचारी संघटना

प्रमुख मागण्या अशा...

नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करण्यासह विभागात सहायकांची रिक्त पदे भरणे.

रखडलेल्या नायब तहसीलदारांच्या पदोन्नती मार्गी लावणे, पदोन्नती, नायब तहसीलदारांची ग्रेड पे ४६०० रुपये करणे.

२७ नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती अस्थायी पदे स्थायी करणे.

तालुकास्तरावर खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करताना पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग ३ पदावर बढती देणे.

यांसह विविध ११ मागण्यांसाठी महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...