आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

162 गुरुजनांचा सत्कार:नाएसाेच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांचे महत्त्वाचे याेगदान; प्रा. रहाळकर यांचे प्रतिपादन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक एज्युकेशन सोसायटी परिवारातील सर्व शिक्षकांचे योगदान आदर्श आहे. त्यांच्या उत्तम योगदानामुळे व अध्ययन-अध्यापनामुळे संस्थेचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.नाएसाेच्या मेरी संकुलातील १६२ गुरुजनांचा व कर्मचारीवर्गाचा शिक्षक दिनानिमित्त जगदीश पाटील यांच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक जगदीश पाटील होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह राजेंद्र निकम, मेरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील सबनीस, मुख्याध्यापिका वर्षा कराडखेडकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक दिलीप अहिरे यांनी केले. सर्व उपस्थित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन प्रा. सूर्यकांत रहाळकर, जगदीश पाटील, राजेंद्र निकम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांना “दीपस्तंभ” पुरस्कार मिळाल्याबद्दल, राजेंद्र निकम यांची राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या “राज्य अध्यक्षपदी” निवड झाल्याबद्दल व पर्यवेक्षिका सुरेखा सोनवणे यांना सावानाचा “आदर्श शिक्षिका” पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...