आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकत्र कुटुंब पद्धती, संस्कृतीचे झिरपणे आहे, रात्र-रात्र जागून किस्स्यांशी खेळणे हा एक काळ हाेता आता आपण विलक्षण काळ अनुभवत आहाेत. या ज्या संस्कृतीच्या खुणा महत्त्वाच्या वाटतात त्या कुठेतरी हरवत चालल्या. घराघरांमध्ये विनाेदच आणि मराठीचे सत्वच कुठेतरी हरवत चाललल्याची खंत ज्येष्ठ कवी अशाेक नायगावकर यांनी व्यक्त केली.
पंडीत भीमसेन जाेशी यांचे शिष्य पंडीत अविराज तायडे यांच्या ‘अवि’स्मरणिय या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. 3) प. सा. नाट्यगृहात झाले, यावेळी नायगावकर यांनी त्यांच्या खास शैलीत संवाद साधत कोपरखळ्याही मारल्या.
ते म्हणाले की, लिहिण्यासाठी काहीतरी भयंकर लेखक, कवी जन्मावा लागताे असे मी एकाला म्हणालाे तर समाेरचा म्हणाला की, गाढवही जन्माला यावेच लागते की... असे विनाेद आता सापडत नाहीत. मुळातच जगण्यातला वात्रटपणा, इरसालपणा कुठेतरी कमी झालाय का? असा प्रश्न करुन त्यांनी शंका उत्पन्न केली.
नायगावकर म्हणाले, एकत्रित राहून तासनतास किस्से एकेत बसण्याची गम्मत आता येत नाही. तरुण मुलं गप्पा मारत बसतात. मी ते चाेरुन ऐकताे. पण त्या गप्पांमध्ये मजा येत नाही. मराठीचा अस्सलपणा त्यात नसताे, त्यात भ ची भाषा, तीचा अस्सलपणा सापडत नाही.
आपले आयुष्य जागे करणारे पुस्तक समाेर असावे. विविध घटनांमधून आपले डाेके शिणलेय, आपण सामान्य माणसं त्यावर काहीच करु शकत नाही. हाच काळ विस्मरणाचा असताे. पण याच काळात आपण वाचू शकताे, लिहू शकताे. तिथे आपले सगळे जुने सापडत जाते असेही ते म्हणाले.
सुरुवातीला नायगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाेजेवार, शब्दमल्हार प्रकाशनाचे स्वानंद बेदरकर, पं. अविराज तायडे, शुभांगी तायडे यांच्या हस्ते ‘अवि’स्मरणीय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पं. तायडे, बोजेवार, बेदरकर यांनीही संवाद साधला यावेळी चित्रकार ज्ञानेश साेनार, प्रा. डाॅ. वृंदा भार्गवे यांचा सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.