आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शाहू महाराज यांचे कार्य अलौकिक असे होते. शाहू महाराजांना समाजाच्या परिस्थितीचे अवलोकन व्हावे यासाठी त्यांच्या वडिलांनी भारतभर फिरण्याचे काम केले. म्हणूनच ते राजा कसा असावा, यावर ते काम करू शकले. त्यांनी २८ वर्षे राज्य कारभार केला. शाहू महाराज हे शिवाजी महाराजांनंतरचे महान राजे ठरले, अशी माहिती नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आपल्या व्याख्यानात दिली.
नीलिमा पवार यांनी गुरुवारी (दि. ५) शांताराम पाटील गडाख स्मृती व्याख्यानात ‘बहुजनांचे उद्धारक छत्रपती शाहू महाराज’ या विषयावर आपले विचार मांडले. यशवंतराव पटांगणात झालेल्या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी जयवंतराव पाटील गडाख, निशांत पाटील गडाख, चंद्रलेखा गडाख, नूतन शिंदे, योगेश शिंदे, श्रीकांत बेणी, चंद्रशेखर शहा आदी उपस्थित होते.नीलिमा पवार म्हणाल्या, शाहू महाराजांनी राज्यकारभार सुस्थितीत करण्यासाठी कार्यालय सुरू केले. ते जो निर्णय घेत त्याची ते वहीत नोंद घेऊन त्यांचे ठराव करीत, या ठरावांची अंमलबजावणीसाठी जात असत, त्याचे हुकूम होत. त्यांचे हुकूम क्रांतिकारी निर्णय होते. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा होता. बहुजनांच्या उध्दारासाठी व्यापार, उद्योग अशा उच्चप्रतीच्या व्यवसायात शिरणे गरजेचे असल्याचे शाहु महाराजांनी जाणले होते. त्यांनी शेतीतही अनेक प्रयोग केले. डोंगराळ भागात समृद्धता आणण्याचा प्रयत्न केला. भूषण काळे यांनी सूत्रसंचालन केले. हिरालाल परदेशी यांनी परिचय करून दिला. श्रीकांत येवले यांनी शांताराम पाटील गडाख यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.