आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:11 दिवसांत चांदीच्या दरात पाच हजार 500 रुपयांनी घसरण; चोख सोन्याचे दर कमी झाल्याने दिलासा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोख सोन्याचे दर २ मे रोजी ५१,७०० (तीन टक्के जीएसटी अतिरिक्त) रुपये प्रती दहा ग्रॅमवर होते. तर अक्षय्य तृतीयेला (३ मे) ५१,३०० रुपयांपर्यंत आले होते. आता १२ मे रोजीही कायम आहेत. मात्र, चांदीच्या दरात या काळात मोठी घसरण बघायला मिळाली आहे. २ मे रोजी चांदीचे दर ६७,००० (तीन टक्के जीएसटी अतिरिक्त) रुपये प्रति किलो होते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ते ५०० रुपयांनी घसरून ६६,५०० रुपयांवर गेले आणि १२ मे रोजी ५००० रुपयांनी त्यात घट होऊन ६१,५०० रुपयांवर पोहोचले आहे. लग्नसराई सुरू होत असल्याने सोने-चांदीचे कमी झालेले दर सामान्यांना काहीअंशी दिलासा देणारे ठरणार आहेत.

रशिया व युक्रेनमध्ये युद्ध झाल्यानंतर सोने, चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र, ८ मार्चनंतर युद्धाचा जोर कमी झाल्याचा परिणाम म्हणून हे दर कमी होण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे दर २५०० रुपयांपर्यंत तर चांदीचे दर ८५०० रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र, युद्धाचा जोर ओसरू लागल्याने दर कमी होत आहेत. विशेष म्हणजे, दर वाढल्याने चढ्या दरांचा फायदा घेत अनेकांनी सोन्याची मोड केल्याचे दिसून येत होते. मात्र, आता दर कमी होत असल्याने खरेदीचे प्रमाण वाढणार आहे, याला लग्नसराईचे कारणदेखील असेल, असे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...