आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • In A Five star Hotel In Shirdi, The NCP Is Brainstorming About The Future, Five star For The Leaders And Utbais In Bhakti Nivas For The Workers.

पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे वेध भविष्यावर मंथन:नेत्यांसाठी पंचतारांकित तर कार्यकर्त्यांसाठी भक्तीनिवासात उठबैस

शिर्डी / नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यापूर्वी राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रवादीला आता वेध भविष्यावर मंथन करण्याची उपरती सुचली असून त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून तर महत्त्वाच्या नेत्यांची प्रमुख 1800 पदाधिकाऱ्यांसोबत उद्या गुरुवारपासून तीन दिवसीय अधिवेशन रंगणार आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ, शेतकरी कर्जबाजारीपणा, परराज्यामध्ये पळवले जाणारे उद्योग आदी गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांपासून तर कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था 400 खोल्यांमध्ये केली असून त्यामध्ये नेत्यांसाठी पंचतारांकित तर सामान्य कार्यकर्त्यांना भक्तनिवासात उतरावे लागणार आहे.

2019 मध्ये केवळ 54 आमदार असतानाही राष्ट्रवादीने भाजपाला सत्तेबाहेर करण्याची किमया दाखवली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले व जवळपास तीन वर्ष प्रचंड कुरबुरी असतानाही सरकार चालवण्याची किमया केली. जून महिन्यामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवले. सत्तेतून पाय उतार झाल्यानंतर राष्ट्रवादीने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खास करून विरोधी पक्षनेते पद अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे राष्ट्रवादीची जबाबदारी वाढली आहे.

अलीकडेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवरून सरकारला घेणे सुरू केले असून ग्रामीण भागातील दौरेही वाढवले आहे. लोकसभा निवडणूक ही जेमतेम सव्वा वर्षावर असल्यामुळे पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांना आगामी कामकाजाचा कार्यक्रम देण्यासाठी शिर्डी येथे तीन ते पाच नोव्हेंबर या दरम्यान तीन दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली असून या निमित्ताने राष्ट्रवादीने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे.

दोन दिवसात 1800 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण..

या अभ्यास शिबिरामध्ये जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष तसेच सर्व विधानसभा निरीक्षक, माजी मंत्री, विद्यमान खासदार आमदार तसेच माजी खासदार, आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 3 नोव्हेंबर अर्थातच गुरुवारी सायंकाळी प्रमुख नेत्यांचे आगमन होणार असून त्यांची पक्षाध्यक्ष पवार यांच्या समवेत महत्त्वाची बैठक होणार असल्याचे समजते. त्यानंतर पुढील दोन दिवस अर्धा तास चार व पाच नोव्हेंबर रोजी दोन सत्रात प्रमुख मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

शिर्डीतील स्थानिक राष्ट्रवादी वाऱ्यावर

प्रदेश पातळीवरचे अधिवेशन असल्याचे कारण देत शिर्डीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे समोर आले. स्थानिक पत्रकारांनी आमदार आशुतोष काळे तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांना संपर्क साधल्यानंतर ही माहिती उपलब्ध झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...