आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या दत्त नगरात गावगुडांची दहशत:अनेक नागरिकांच्या घरांवर दगडफेक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या चित्रपटाला शोभेल असं गुंडगरीचे चित्र सद्यस्थितीत नागरिकांना अंबड येथील दत्तनगर भागात पाहावयास मिळत आहे. 50 ते 100 गुंडांचा घोळका नागरिकांच्या घरांवर दगडफेक करीत असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दत्त नगर येथे अंतेश सिंह नावाच्या गुंडाने प्रचंड दहशत निर्माण केली असून तो टवाळखोरांना परिसरात आणून नागरिकांना वेठीस धरत आहे. रस्त्याने या सगळ्या गुंडांना एकत्रित घेऊन दगड काठ्या घ्यायच्या आणि नागरिकांच्या घरांवर हल्ले करत चालायचं असा प्रकार घडतो आहे.

दोन दिवसांपूर्वीच यांच्या एका गुंडाचा वाढदिवस साजरा झाला आणि तेथे झालेल्या वादा नंतर प्रचंड दहशत माजवण्यात आली. दहा ते बारा नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली त्यातील काही नागरिक हे जखमी झाले. या गुंडांची इतकी दहशत आहे की कोणीही नागरिक यांच्या विरोधात तक्रार द्यायला पुढे येत नाही. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पोलिसांना हा विषय कळवला मात्र नेहमीप्रमाणेच उशिरा आलेल्या पोलिसांनी गांभीर्याने न घेता कारवाईस टाळाटाळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वर्षभरापूर्वी गरोदर महिलेला मारहाण - याच गुंडांनी असाच पद्धतीने वर्षभरापूर्वी दहशत निर्माण करून एका गरोदर महिलेला मारहाण केली होती. मात्र पोलिसांच्या संपलेल्या दारा-यामुळे कारवाईमुळे या गुंडांनी पुन्हा असा प्रकार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत अंबड पोलिसांच्या भूमिकेवर लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन

सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर म्हणाले की, ​​​​​​​आम्ही या गुंडगिरीबाबत पोलिसांना वारंवार सांगितले आहे. मात्र त्यांना गांभीर्य वाटत नाही. येथे सक्षम आधिकाऱ्याची गरज असून, योग्य कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

बातम्या आणखी आहेत...