आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बँकेतील डिपॉझीटच्या तुलनेत रिअल इस्टेटमधील गुंतवणूक अव्वल ; डिपॉझीट्समधून उणे 1.45% तर फ्लॅटमधील गुंतवणुकीतून 40% परतावा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये रिअल इस्टेटमधील गुंतवणूक किती फायद्याची ठरली आहे, हे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत म्हणजे, २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत रिअल इस्टेटमध्ये म्हणजे फ्लॅटच्या खरेदीत गुंतवणूक केलेल्यांना सरासरी ३५ टक्के परतावा मिळाला तर गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपैकी प्राधान्य दिल्या जाणाऱ्या बँकेतील फिक्स डिपॉझीटमधून मात्र नकारात्मक म्हणजे वजा १.४३ टक्के परतावा ग्राहकांच्या हाती पडला आहे. यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक हुकमी असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नाशिकमध्ये घर असावे असे स्वप्न केवळ येथील नागरिकांनाच नाही तर गुंतवणूक किंवा सेकंड होम म्हणून नाशिकमध्ये घर खरेदी करण्याची इच्छा आजूबाजूच्या शहरांतूनदेखील मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जाते. त्यातच शहराचा ज्या गतीने विकास होत आहे आणि येथील वातावरण, हॉस्पिटल्स, उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, शॉपिंग कल्चर, ऐतिहासिक व पौराणिक ओळख टिकवून होत असलेली औद्योगिक विकासाकडची वाटचाल याचमुळे येथे रिअल इस्टेटमधील गुंतवणूक दिन दुगना चार चौगुना फायदा करून देणारी ठरत आहे गेल्या पाच वर्षात लोकांत पारंपारिक गुंतवणूक पर्याय असलेल्या बॅंकांच्या ठेवींचा दर कमी कमी होत गेला असून तो नफा मिळवून देण्यापेक्षा नकारात्मक स्थितीत गेला आहे.

तर रिअल इस्टेटमध्ये शहराच्या विविध भागात फ्लॅट खरेदीचा विचार करता सरासरी ३५ टक्के तर सर्वोच्च ४० टक्क्यांपर्यंतचा परतावा गुंतवणूकदारांना, घर खरेदी करणाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे पारंपारिक बॅंक डिपॉझिटचा पर्याय तपासून पहात महागाइच्या दराची तुलना करून रिअल इस्टेटमधुन मिळणाऱ्या उच्च परताव्याचा विचार जाणिवपूर्वक करणे गरजेचे आहे.

कुठे गुंतवणूक केल्यावर किती मिळाला फायदा
गुंतवणुकीचा प्रकार वर्ष २०१७ २०२२ परतावा (%)
रिअल इस्टेट ३२०० ४५०० ४० (फ्लॅट) प्रति चौरस फूट)
बँक एफ.डी. ६.७०% ५.२५% -१.४५

रिअल इस्टेट : शहराच्या या भागातील फ्लॅटचे प्रति चौरस फूट दर
गंगापूररोड ३२०० रु. ४५०० रु. ४१
आडगाव/ पाथर्डी २५०० रु. ३४०० रु. ३६
इंदिरानगर २७५० रु. ३६०० रु. ३०.९०
सरासरी मिळालेला परतावा

बातम्या आणखी आहेत...