आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या महिला अधिकाऱ्यांची पर्स चोरी:अवघ्या काही तासातच रेल्वे पोलिसांनी केला सीसीटीव्हीद्वारे उलगडा; मायलेकी ताब्यात

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभागात कार्यरत महिला अधिकारी स्मिता सुर्यंकात लोंढे नाशिकहून तपोवन एक्सप्रेसने औरंगाबादला जाताना त्यांची पर्स लंपास झाली. ही बाब रेल्वे अधिकाऱ्याला समजताच त्यांनी काही वेळातच मायलेकींना ताब्यात घेत त्यांच्याकडून पर्समधील चोरलेले दागीने जप्त केले.

रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार,औरंगाबाद येथील स्मिता सूर्यकांत लोंढे (वय 28) या 13 जून रोजी शासकीय कामानिमित्त नाशिकरोड येथील महसूल आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी 14 जून रोजी सकाळी तपोवन एक्स्प्रेसने बोगी डी 3 मधून औरंगाबादकडे जाण्यासाठी निघाल्या. गाडीने नाशिकरोड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही वेळाने लोंढे यांची पर्स कापून त्यामधील 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स व रोख 4 हजार रुपये असे चोरीला गेल्याचे लक्षात आले.

यानंतर त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दिली. नाशिकरोड लोहमार्ग पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर हवालदार संतोष उफाडे यांनी सीसीटीव्ही कॅमरे पाहून तपास चक्रे फिरवली. उफाडे यांना तपोवन एक्सप्रेसवर गस्त घालत असताना दोन संशयित महिला त्यांच्या निदर्शनास आल्या.

विमल धोंडू शिंदे, ,जमुना लक्ष्मण आठवले या दोंघींना ताब्यात घेतल्यानंतर या मायलेकिना पोलिस नाईक अश्विनी प्रधान, रेल्वे सुरक्षा दलाचे विशाल पाटील, सागर वर्मा यांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडील सोन्याच्या टाँप्ससह 2 हजार रुपये रोख असा 42 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. हा तपास अंमलदार ए एस आय सुभाष कुलकर्णी. पोलीस हवालदार संतोष दत्तात्रेय उफाडे, दिपक निकम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...