आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:खंडेरावनगरात पाण्यासाठी फिरफिर, आॅनलाइन तक्रारीला मनपा प्रशासनाची केराची टाेपली

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडवलेणी जवळील खंडेरावनगर परिसरातील उच्चभ्रू सोसायटी परिसरात गेल्या चार महिन्याापासून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाणी प्रश्नाबाबत ऑनलाइन तक्रार केली परंतु सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. खंडेरावनगर परिसरात लक्ष्मी नारायण हाईट, सप्तशृंगी अपार्टमेन्ट, बालाजी रेसिडेन्सी, हरीविश्व सोसायटीसह पंचतारांकित हॉटेल परिसरातील रहिवासी नियमित मनपाचेकर भरतात.

असे असताना या परिसरात मूलभूत सोयी सुविधा मिळत नाही. या परिसरात मुख्य पाण्याची समस्या भेडसावत असल्याने नोकरदार व गृहिणींना पाण्यासाठी वणवण करावी लागते. येत्या आठ दिवसांच्या आत पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. एेन थंडीत पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असून महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अन्यथा पालिकेवर हंडामाेर्चा काढला जाईल, असा इशारा महिलांनी दिला. लाेकप्रतिनिधींचे देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...