आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवितहानी टळली:महादेवनगरला घरावर वृक्ष काेसळल्याने छत पडले

सातपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जोरदार पावसात सातपूर महादेवनगर येथे बुधवारी (दि १) मध्यरात्री जिभाऊ गुलाब धिवरे यांच्या घरांवर धोकादायक गुलमोहराचे झाड घराच्या छपरावर पडल्याने पत्र्याचे छप्पर व भिंतीला तडे गेले. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली.

धिवरे यांनी धोकादायक झाड तोडण्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात अर्ज केला होता. रस्त्याच्या कडेला कमकुवत झालेला हा गुलमोहराचा वृक्ष ताेडण्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी अर्ज करूनही उद्यान विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. याआधीही सातपूर आयटीआयजवळील उद्योग भवन येथे गुलमोहराचे झाड रिक्षावर पडून दोन व्यक्ती जागीच ठार झाल्या होत्या. असे असताना सातपूरला अनेक ठिकाणी धोकादायक वृक्ष छाटण्याबाबत पालिकेकडे अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कर्मचारी मनमानी करतात, जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत.

भरपाई द्यावी : पालिकेस अर्ज करूनही वृक्ष ताेडण्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे वृक्ष काेसळून छप्पर पडल्याने जे नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...