आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालानंतर क्रम नोंदणी:राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीचे प्रवेश यंदाही ऑनलाइन; नाशिकमध्ये 25 हजार जागा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील प्रमुख शहरांमध्येही अकरावी प्रवेशासाठी यंदाही केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, त्यापूर्वी या प्रवेश प्रक्रियेतंर्गत अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा ३० मेपासून सुरू करण्यात आलीय. नाशिकमध्ये ६० कनिष्ठ महाविद्यालये असून त्यात कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा मिळून सुमारे २५ हजार जागा उपलब्ध आहेत.

कुठे भराल अर्ज?

नाशिकसह राज्यातील मुंबई, पुणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. तर ग्रामीण, तसेच इतर शहरांमध्ये ऑफलाइन पद्धतीने पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रॅक्ट्रीस व्हावी यासाठी २३ ते २७ मे दरम्यान डेमो रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रवेश अर्ज कसा भरावा, अर्ज भरताना कोणही माहिती आवश्यक आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना या सुविधेमुळे मिळाली. ३० मेपासून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये वैयक्तिक माहितीसह इतर माहिती भरणे अनिवार्य असेल.

माहिती करा प्रमाणित

प्रवेशासाठीचे अर्ज प्रमाणित करून घेता येणार आहेत. त्याशिवाय आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करता येतील. ऑनलाइन शुल्क भरून फॉर्म लॉक करणे आणि अर्ज प्रमाणित करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र निवडणे, अशा सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शक केंद्रांनी विद्यार्थ्यांनी भरलेले प्रवेश अर्ज भाग एकमधील माहिती तपासून प्रमाणित करणे अनिवार्य आहे..

कशी होईल प्रवेश प्रक्रिया?

अकरावीचे प्रवेश हे https://11thadmission.org.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतील. 2022-23 मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवावीत. पोर्टल सुरू झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व तिसऱ्या टप्प्यात प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे असे टप्पे असतील. प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये निवडून तो क्रम नोंदविण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार आहे.

नाशिकमध्ये अकरावीच्या जागा

कला - ४९१०

वाणिज्य - ८६८०

विज्ञान - १०५२०

संयुक्त शाखा - १२७०

एकूण - २५३८०

बातम्या आणखी आहेत...