आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत; भाजप कामगार आघाडीची कार्यकारिणी जाहीर

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर कामगार आघाडीची कार्यकारिणी आघाडीचे अध्यक्ष हेमंत नेहेते व शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत घोषित करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, कामगार आघाडी प्रदेश चिटणीस विक्रम नागरे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनील बच्छाव उपस्थित होते. निवडलेली कार्यकारिणी याप्रमाणे

अध्यक्ष : हेमंत नेहेते, उपाध्यक्ष : साईनाथ गाडे, रोहित गिते, अविनाश पाटील, विनोद पाटील, सरचिटणीस : रोहित कुंडलवाल, गणेश काकड, चिटणीस : भाऊराव देवरे, साहेबराव भरीत, सचिंद्र मोरे, नीरज गिज यांचा समावेश आहे. याप्रसंगी लक्ष्मण सावजी व शहराध्यक्ष पालवे यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, महेश हिरे, सुहास फरांदे, विजय साने, सरचिटणीस पवन भगुरकर, सुनील केदार, जगन पाटील, प्रदीप पेशकार, आशिष नहार, महानगर मंडलाध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्ञानेश्वर काकड, हेमंत गायकवाड, भास्कर घोडेकर, देवदत्त जोशी, सुनील देसाई, अविनाश पाटील, शिवाजी बरके, भगवान काकड, प्रसाद आडके, हिमगौरी आडके अमित घुगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे अनेक जण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...