आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक भेदभाव:नाशिकमध्ये अकरावीतील 23 आदिवासी विद्यार्थिनींना वेगळे बसवले, चाैकशीसाठी समिती नियुक्त

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नामांकित भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलमध्ये सामाजिक भेदभाव करत अकरावीतील २३ आदिवासी मुलींना नापास तर करण्यात आलेच, मात्र त्यांच्यासाठी स्वतंत्र तुकडी निर्माण केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. आदिवासी उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी याप्रकरणी चाैकशी समिती गठित केली आहे. दरम्यान, ‘भोसला मिलिटरी’ने या प्रकरणाचा इन्कार केला आहे. नापास केलेल्या मुलींची १० दिवसांत पुनर्परीक्षा घेऊन त्यांना १२ वीत प्रवेश देण्याची लेखी हमी संस्थेच्या वतीने प्राचार्यांनी आदिवासी विकास विभागाला दिली.

कोराेनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला होता. तसेच आॅनलाइन शिक्षणामुळे मुलांना नापास करू नये, अशी सूचना शासनाच्या वतीने शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. असे असतानाही दहावीत ६० ते ७३ टक्के गुण मिळवणाऱ्या २३ विद्यार्थिनींना अकरावीत मात्र नापास करण्यात आले. इतकेच नव्हे तर नापास केलेल्या दाेन विद्यार्थिनींना बळजबरीने ११ वी नापास असा उल्लेख करून शाळा सोडल्याचा दाखलाही देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. संतप्त झालेल्या पालकांनी आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यामुळे सोमवारी (२० जून) आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष अशाेक बागूल, राज्याध्यक्ष रावण चाैरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्त कार्यालयात धाव घेऊन जाब विचारला.

बातम्या आणखी आहेत...