आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात, मुंबईत फोडले 30 गोदाम!:मुंबईत राहायचा अन् नाशिक पंचक्रोशित गोदाम फोडायचा, अट्टल चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरदचंद्र पवार फळ मार्केट परिसरातील होलसेल किराणा मालाचे दुकान फोडून 4 लाख 76 हजारांचे तेलाचे डब्बे चोरी करणाऱ्या मुंबई येथील सराईत चोराला अटक करण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे.

महावीर जोहरसिंग कुमावत (रा. मिरारोड इस्ट, ठाणे) असे या संशयिताचे नाव आहे. पथकाने ठाणे येथे ही कारवाई केली. शरदचंद्र पवार फळ मार्केटच्या आवारातील जे. एन. ट्रेडर्स होलसेल किराणा दुकानाचे शटरचा कोयंडा कापून गोदामामधील विविध कंपन्यांचे गोडेतेलाचे 102 डबे, पाच लिटरच्या 48 कॅन आणि 40 बाॅक्स या प्रत्येक बाॅक्समध्ये 10 पॅकेट आणि साबुदाण्याचे 30 किलो वजनाचे 8 कट्टे व 10 हजारांची रक्कम चोरी केली होती.

या गुन्ह्याचा गुन्हे शाेध पथकाकडून तपास सुरू असतांना पथकाने परिसरातील सीसीटिव्ही चित्रीकरणाची तपासणी केले. येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर सीसीटिव्हीमध्ये संशयित टेम्पो दिसून आला. या आधारे महामार्गावरील सर्व टोल नाक्यावरील सीसीटिव्ही चित्रीकरणाची तपासणी करण्यात आली. संशयित टेम्पो हा ठाण्याला गेल्याची माहिती मिळाली. टेम्पोला नंबर नसल्याने तपासात अडथळे आले.

पथकाने ठाणे महामार्गावरील हाॅटेल ढाबे, आणि पडघा टोलनाक्याचे सीसीटिव्हीची पाहणी केली असता संशयित वाहनाची माहीती मिळाली. ठाणे शहरातील मुख्य मार्गावरील सीसी टिव्ही तपासणी केल्या असता टेम्पो कापुर बावडी मार्गे घोडबंदरच्या दिशेने गेल्याचे समजले. पथकाने परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे संशयित टेम्पोचा माग काढला.

नवघर पोलिसांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ निरिक्षक डाॅ. सिताराम कोल्हे, सहायक निरीक्षक सत्यवान पवार, सागर कुलकर्णी, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, घनश्याम महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

असा सापडला धागा

संशयित टेम्पो ठाण्याला गेल्याचे निष्पन्न झाले. नंबर नसल्याने शोध घेणे अवघड होते. पथकाने ठाणे व घोडबंदर परिसरात तपास करत स्थानिक पोलिसांच्या मदतीने २०० किमी अंतरपर्यंत सीसीटिव्ही तपासले. हा टेम्पो मिरारोड परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. नवघर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद देसाई, योगेश काळे यांच्या मदतीने संशयिताला ताब्यात घेतले.

चाेरलेल्या मालाची विक्री

संशयिताने चोरी केलेले तेल डब्यांची विक्री केली. त्याच्या घरातून १० तेलाचे डब्बे जप्त करण्यात आले. 2 लाख 95 हजारांची रक्कम, गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा 7 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

गोदाम फोडल्याचे 30 गुन्ह्यांची नोंद

संशयित आणि त्याच्या साथीदारांवर कांदीवली, नवघर, कस्तुरबा मार्ग, तुळींज, माणिकपूर, वसई, दिंडोशी, काशीमीरा, चारकोप, मिरारोड, गुहागर, दहीसर, चिपळुण, चितळसर, भाईंदर, एमआयडीसी पोलिस ठाणे, पांडेसर, जुनागड सुरत या पोलिस ठाण्यात किराणा मालाचे गोदाम फोडण्याचे गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...