आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • In Nashik, A Toddler Died Of Shock From The Fridge, A Heartbreaking Incident Took Place In A Shop After Going To Buy Ice Cream; Caught On CCTV,

VIDEO नाशिकमध्ये वडिलांच्या डोळ्यांदेखत चिमुरडीचा मृत्यू:आइस्क्रीम पार्लरमध्ये लागला फ्रीजचा शॉक; हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये आईस्क्रीम घ्यायला गेलेल्या मुलीचा फ्रीजचा शाॅक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ आज समोर आला.

नाशिकच्या त्रिमूर्ती चौक परिसरातील काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. एक मुलगी आईस्क्रीम घ्यायला गेली असताना फ्रिजसमोर ती उभी राहिली. त्यानंतर चिमुकलीला विजेचा धक्का बसला व यातच तिचा मृत्यू झाला. ग्रीष्मा विशाल कुलकर्णी असे मृत मुलीचे नाव आहे. ग्रीष्माच्या मृत्यूने कुलकर्णी कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

कशी घडली घटना?

ग्रीष्माचे वडील विशाल कुलकर्णी (रा.जगताप नगर, उंटवाडी) हे घराजवळ असलेल्या दुकानात तिला घेऊन रात्री 9 वाजेच्या सुमारास आईस्क्रीम आणायला गेले होते. यावेळी ग्रीष्मा ही फ्रीजला हात लावून उभी राहत आईस्क्रीम पहात होती. फ्रीजच्या खाली असलेल्या वायर्सचा तिला शॉक लागला आणि ती खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. आईस्क्रीम खाण्याची ईच्छा असलेल्या चिमुकलीचा असा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेने ऐन गणपती उत्सवात कुलकर्णी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

बेजबाबदारीमुळे मृत्यू

ज्या ठिकाणी ही घटना घडली ते दुकान हे मेडिकल असून दुकानदाराने बाहेर फ्रीज आणून ठेवले होते. हे ठेवताना कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या. यामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. अंबड पोलिसांनी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सगळीकडे हळहळ

संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. दुकानदारांच्या बेजबाबदारपणा बाबत संताप व्यक्त होत असला तरी पालकांनी काळजी घ्यावी अशीही चर्चा होत आहे.

बातम्या आणखी आहेत...