आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्हीच्या अधारे आरोपी जाळ्यात:नाशिकमध्ये ATM कार्डची अदलाबदल करून 23 ​​​​​​​हजारांची रक्कम लंपास

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ATM सेंटरमध्ये महिलेला मदत करण्याचा बहाणा करत कार्डची अदला बदल करत कार्डचा पिन नंबर घेत 23 हजारांची रक्कम ऑनलाईन काढून फसवणूक करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. सोमवार (दि. 6) रोजी भद्रकाली पोलिसांनी जेलरोड येथे ही कारवाई केली. विरिंदर बिलबहादुर कौशल वय 42 रा. जेलरोड असे या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अर्चना रोकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, द्वारका परिसरातील स्टेट बँकेच्या ATM सेंटरमध्ये नवीन कार्डचा पिन नंबर जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संशयिताने मी बँकेचा प्रतिनिधी आहे. तुम्हाला मदत करु का, असे सांगीतले. मदत करतांना कार्डचा पिनकोड नंबर माहिती करत कार्ड देतांना दुसरे कार्ड दिले. रोकडे यांच्या कार्डच्या अधारे त्यांच्या बँक खात्यातून 23 हजार रुपये काढून घेतले होते. वरिष्ठ निरिक्षक दत्ता पवार, ज्ञानेश्वर मोहिते, विशाल काठे, कय्युम सय्यद, संदीप शेळके, रमेश कोळी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सीसीटीव्हीच्या अधारे काढला माग

संशयित सेंटर मधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पथकाने रस्त्यावरील 15 ते 20 सीसीटीव्हीची तपासणी केले. संशयित हा द्वारका, टाकळीरोड मार्गे जेलरोड कडे गेल्याचे निदर्शनास आले. पथकाने जेलरोड येथे सापळा रचून संशयिताला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...