आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:नाशिकमध्ये 26 जुलै रोजी ओबीसी आरक्षण सोडत, 27 रोजी 104 जागांवर निघणार महिला आरक्षण

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४४ प्रभागांमध्ये १३३ जागा आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत असलेल्या १०४ सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून ३६ जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी २६ जुलै रोजी नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. त्यानंतर २९ जुलै रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या आरक्षित जागांसाठी सोडत निघेल. प्रभागनिहाय प्रारूप प्रसिद्धी व त्यावर हरकती सूचना दाखल करून अंतिम आरक्षण प्रसिद्धीची प्रक्रिया ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल.

नाशिकसह राज्यातील १३ महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण, तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गातील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यापूर्वी ३१ मे २०२२ रोजी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आरक्षित जागांबाबत हरकती व सूचना मागवून १३ जून रोजी आरक्षण अधिसूचना अंतिम करण्यात आली. मात्र, २० जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचे २८ डिसेंबर २०२१ चे आदेश सुधारित केले आहेत. त्यानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जाणार नाही या मर्यादेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवायच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...