आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये शिंदे गट- भाजपचे जमेना:सीएम बैठकीवरून हिरे-गाेडसेंत श्रेयवाद अन् दावे-प्रतिदावेही; फडणवीस लक्ष घालण्याची शक्यता

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिक महापालिकेशीसंबधित विविध प्रश्नासंदर्भात आयाेजित बैठकीचे श्रेय घेणारी प्रेसनाेट खासदार हेमंत गाेडसे यांनी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबधित बैठक आपल्याही मागण्यासंदर्भात निर्णयासाठी बाेलवल्याचा दावा भाजप आमदार सीमा हिरे यांनी केला.

फडणवीस लक्ष घालणार?

अशा अनेक बैठका हाेत असतात मात्र, त्याबाबत ठाेस निष्पन्न झाल्यनंतरच आम्ही माहिती देत असताे असे सांगत उठसूठ निवेदने देवून चमकाेगिरी करणाऱ्यांना त्यांनी नाव न घेता चिमटा काढला. दरम्यान, नाशकात शिंदे गट व भाजपाची जमेना अशी अवस्था असून आता अस्वस्थ भाजपेयींना बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच लक्ष घालणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्रिपद पदरात

राज्यात जून महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट व भाजप मिळून सरकार स्थापन झाले. दाेन आमदार असताना शिंदे गटाने भाजपचे पाच आमदार असूनही पालकमंत्रीपद मिळविले. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर शिंदे गटाने नाशिक महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री भुसे यांनी दाेन बैठका घेत भाजपाच्याकाळात प्रलंबित प्रश्नांना गती देण्याचा प्रयत्न केला.

हे करताना नकळत भाजपाच्या अकार्यक्षमतेवरही शिक्केमाेर्तब झाले. शहरातील सत्तेतून भाजप नुकतीच पायउतार झाली असली तरी, अनेक ज्येष्ठ नगरसेवक आहेत, मात्र त्यांना पालिकेच्या बैठकीत बाेलवले गेलेले नाही. माजी महापाैर, माजी स्थायी समिती सभापती तर साेडा मात्र आमदारांनाही बाेलवले जात नसल्यामुळे सत्ता काय कामाची असा प्रश्न हाेता. याबाबत टिका झाल्यानंतर भुसे यांनी गुरूवारी अर्थातच दाेनच दिवसापुर्वी भाजप आमदारांना साेबत घेत एकत्र कामकाज सुरू केले. मात्र,

हे हाेत नाही ताेच खासदार गाेडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महापालिकेतील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक लावली. या बैठकीच्या प्रेसनाेटमध्ये काेणते प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार यांची नावे हाेती मात्र, भाजप आमदारांची नावे नसल्यामुळे त्यांना धक्का दिल्याची चर्चा हाेती.

अशातच, आता, आमदार हिरे यांनी संबधित बैठकही आपल्या सांगण्यानुसार बाेलवल्याचा दावा केला. शहरातील मिळकतींना रेडीरेकनरनुसार भाडे आकारणी केली असून सामाजीक संस्थांना हे दर परवडत नाही. समाज मंदिर, अभ्यासीका तसेच खाेका मार्कट व व्यापारी संकुलातील गाळेही चालवणे अवघड झाले आहे. पेलीकन पार्क, सिडकाेतील 28 हजार घरे फ्री हाेल्ड करणे अशा विविध मागण्यांसाठी आपणच बैठक बाेलवली हाेती. मात्र, अचानक ही बैठक तेव्हा रद्द झाल्याचाही दावा केला आहे. हिरे यांच्या दाव्यामुळे बैठकीवरून सुरू झालेला श्रेयवाद चर्चत आला आहे.

लाेकांचे प्रश्न सुटले तरच समाधान

आमदार म्हणून नाशिकमधील विविध प्रश्नासंदर्भात अनेक बैठका मंत्रालयात हाेत असतात. या बैठकीतून ठाेस निष्पन्न झाले तर त्याचे आम्हाला व लाेकांनाही समाधान वाटते. त्यामुळे ठाेस निर्णय झाले तरच बैठकीबाबत आम्ही सांगत असताे. - सीमा हिरे, आमदार

बातम्या आणखी आहेत...