आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करणार:चंद्रकांत पुलकुंडवारांचे आश्वासन, आयमा पदाधिकाऱ्यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड आणि सातपूरच्या उद्योजकांच्या विविध समस्यांचे निराकरण करु आणि सातत्याने बैठका घेऊन त्याबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयमा) अध्यक्ष निखिल पांचाळ आणि सरचिटणीस ललित बूब यांच्या नेतृत्वाखाली आयमा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पुलकुंडवार यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.

अगोदरच्या आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी तसेच आयमा परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष समस्या जाणून घ्याव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरच भेट देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पांचाळ यांनी दिली. अंबड औद्योगिक परिसराच्या मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करावी अशी

रिक्षांसाठी पार्किंग निश्चित करा

अंबड औद्योगिक वसाहतीतील कचरा आणि पालापाचोळा संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी असावी आणि त्या गाडीला वेगळा रंग द्यावा औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत टेम्पो, बस आणि रिक्षांसाठी पार्किंगची जागा निश्चित करून द्यावी.

जाचक घरपट्टीवर चर्चा

औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांना संरक्षक भिंत बांधावी व अतिक्रमणे काढावीत आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. जाचक घरपट्टीबाबतही यावेळी चर्चा झाली. पूर्वी निवासी, वाणिज्य आणि उद्योगसाठी स्वतंत्र दर होते. मात्र तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारकिर्दीत निवासी आणि वाणिज्य असे दोन दरच ठेवल्याने उद्योजकांना त्याचा जोरदार फटका बसला

आयुक्तांचे आश्वासन

घरपट्टी आमच्यासाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे आम्हाला वाणिज्य ऐवजी पुन्हा औद्योगिक श्रेणीत ठेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच फायरसेस महापालिका आणि एमआयडीसी या दोन यंत्रणांऐवजी एकाच यंत्रणेस भरावा लागेल अशी व्यवस्था करा असे सांगितले असता या दोन्ही मुद्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

रस्त्यांची अवस्था दयनीय

अंबड आणि सातपूर औद्योगिक औद्योगिक वसाहत परिसरातून महापालिकेला सर्वाधिक महसूल मिळतो. परंतु असे असले तरी या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीवर तर त्याचा परिणाम होतो. आणि मालाची ने-आण करण्यावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याने आयुक्तांनी या मुद्द्याकडे गांभीर्याने बघावे आणि औद्योगिक वसाहतींना भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी असे आवाहन उद्योजकांनी केले. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे यांचाही समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...