आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • In Nashik's Aadhaar Ashram, A Minor Tribal Girl Was Raped By The Head Of The Institution, Showing A Porn Film On A Mobile Phone, A Double Act!

आधारआश्रमात अल्पवयीन आदिवासी मुलीवर संस्थाचालकाचा बलात्कार:हातपाय दबण्याचे सांगून पाॅर्न फिल्म दाखवत दोनदा कृत्य!

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हातपाय दाबून देण्यास सांगत मोबाईलवर पाॅर्न फिल्म बघण्यास सांगून संस्थाचालकाने अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला.​​

​​ मानेनगर येथील द किंग फाऊंडेशन ज्ञानदिप गुरुकुल या आधार आश्रमात शिक्षणासाठी निवासी असलेल्या मुलीसोबत हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संस्था चालक संशयित हर्षद बाळकृष्ण मोरे याच्याविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्रमात घडला प्रकार

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुलगी एका पाड्यावर आई वडील भावासोबत राहते. ती सहावीपासून या आश्रमात वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री मुलगी आश्रमात झोपलेली असताना रात्री संशयित हर्षद मोरे याने पीडित मुलीला इमारतीच्या पत्र्याच्या खोलीत बोलवले.

पाॅर्न फिल्म दाखवली

''तु माझे हातपाय दाबून दे'' असे तिला संशयिताने सांगीतले. मुलगी हातपाय दाबत असताना संशयिताने मोबाईलमध्ये पाॅर्न फिल्म सुरु केली. बळजबरीने मुलीला बघण्यास सांगीतली. मुलीने विरोध केला तेव्हा ''तु माझे काम केले नाही, तर मी तुला होस्टेलमधून काढून टाकेल'' अशी धमकी देत मुलीवर अत्याचार केला. घडलेला प्रकार मुलीने तीची चुलत बहिणीला हा प्रकार सांगीतला.

नातेवाईकांनी घेतले विश्वासात

पीडित मुलीला सोबत घेऊन तीच्या मामाकडे आणले. मामी विश्वास घेत मुलीला नाराज का आहे. याबाबत विचारणा केली असती मुलीने तीच्या सोबत घडलेला प्रकार कथन केला. तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. वरिष्ठ निरिक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

इतर मुलींबाबत अत्याचाराचा संशय

संशयिताच्या आश्रमात अदिवासी समाजाच्या 13 मुली आणि 14 मुले वास्तव्यास आहेत. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार इतर मुलींना सांगीतला असता यातील 14 ते 15 वयोगटातील मुलींवर संशयिताने अशाच प्रकारे अत्याचार केल्याची धक्कादायक बाब प्रथमदर्शनी पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

मुलींच्या पालकांना देत होता आमिष

संशयित मोरे हा अदिवासी भागात गरीब मजुरी करणाऱ्या मुलींच्या पालकांना हेरून त्यांना अदिवासी समाजाला शिक्षणाचा फायदा आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण दिले जाते. मोफत राहण्याची जेवणाची सुविधा असल्याचे सांगत मुलींना आश्रमात घेऊन येत होता.

सासु सांभळते होस्टेल

संशयित मोरे याची सासु आणि एक महिला होस्टेल मध्ये मुलींची व्यवस्था सांभळते. त्याची पत्नी मालेगाव येथे वास्तव्यास आहे. पोलिसांकडून सासुची आणि मदतनीस महिलेची चौकशी सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...