आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची गैरसाेय‎:पाथर्डी, इंदिरानगर भागात‎ तब्बल 8 तास वीज खंडित‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी येथील उपकेंद्राला‎ जोडणाऱ्या ३३ केव्हीच्या‎ वाहिनीमध्ये तांत्रिक कारणांमुळे‎ बिघाड झाल्याने सोमवारी (दि. ६) ‎ पाथर्डी फाटा परिसरातील‎ वीजपुरवठा तब्बल आठ तास‎ खंडित हाेता. सकाळी ८.३०‎ वाजेपासून वीजपुरवठा खंडित‎ झाला हाेता.‎ पाथर्डी उपकेंद्रावरून वीजपुरवठा ‎होणाऱ्या पाथर्डी फाटा परिसरापासून‎ ते राजीवनगर, राणेनगर,‎ वासननगर, पार्कसाइड, मेट्रोझोन, ‎ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, हाॅटेल‎ सेव्हन परिसर, पाथर्डी गाव,‎ वाडीचेरान, नांदुररस्ता अशा सर्व‎ भागातील वीजपुरवठा विस्कळित झाला.

त्यामुळे या भागातील‎ नागरिकांना अडचणींचा सामना‎ करावा लागला. दुपारनंतर‎ वीजपुरवठा सुरू करण्यात आला.‎ मात्र, पाथर्डी गाव तसेच पाथर्डी‎ फाटा परिसरात सायंकाळी पुन्हा‎ काही वेळ वीज खंडित झाली हाेती.‎ भूमिगत विद्यूत वाहिनीमध्ये‎ बिघाड झाल्याने विद्युत विभागाच्या ‎ ‎ कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा‎ सुरळित करण्याचे काम सुरु होते.‎

तांत्रिक अडचणीमुळे‎ वीजपुरवठा खंडित‎
‎ पाथर्डी फाटा‎ ‎ परिसरात‎ ‎ वीजपुरवठ्यात‎ ‎ तांत्रिक अडचणी‎ ‎ येत आहेत. या‎ ‎ अडचणी दूर‎ करण्याचे काम वेगाने सुरू आहे.‎ वीजपुरवठा सुरळीत करण्याचा‎ प्रयत्न केला जात आहे. - संदीप‎ वारे, सहाय्यक अभियंता, पाथर्डी‎ विभाग‎

महावितरणच्या‎ कर्मचाऱ्यांकडून अरेरावी‎
‎ येथील वीज‎ ‎ मंडळाचे‎ ‎ आधिकारी व‎ ‎ कर्मचारी हे‎ ‎ अतिशय‎ ‎बेजबाबदार‎ असून नागरिकांना आरेरावीची भाषा‎ करतात. वीज का गेली? याबाबत‎ माहिती न देता त्यांची मनमानी सुरू‎ आहे. - रवींद्र गामणे, सामाजिक‎ कार्यकर्ते‎

बातम्या आणखी आहेत...