आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष‎:शिवपुरी चाैकात रस्त्यातच टाकले‎ ढापे, नागरिकांना रहदारीस अडथळा‎

सिडको‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको भागात महापालिकेच्या‎ बेजबाबदारपणाची अनेक उदाहरणे‎ समोर येत असताना, शिवपुरी‎ चौकात चक्क रस्त्यातच‎ खाली-वर ढापे टाकून ड्रेनेज‎ विभागाने बेजबाबदारपणाची हद्दच‎ आेलांडली असून मार्गक्रमण‎ करताना नागरिकांना प्रचंड त्रास‎ सहन करावा लागत आहे.‎ महापालिकेचे काम करताना‎ अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या‎ संमतीने ठेकेदार मनमानी कारभार‎ करत आहेत. असाच प्रकार‎ सिडकोतील शिवपुरी चौक,‎ ब्रह्मगिरी महादेव चौक, माणिक‎ हाइट्सच्या बाजूच्या भागात समोर‎ आला आहे.

या ठिकाणी‎ नागरिकांना जाण्यासाठी रस्ता‎ आहे. याच रस्त्यातून ड्रेनेज‎ विभागाची पाइपलाइन जाते. ही‎ पाइपलाइन खोदत असताना ते‎ पाइप रस्त्यामध्ये किती खोलीत‎ असावेत? व त्यानंतर त्याच्यावर‎ ढापे कशा पद्धतीने बसवावेत?‎ याबाबत काही नियम आहेत. मात्र,‎ हे सर्व नियम धाब्यावर बसवत या‎ ठिकाणी रस्ता खाली व ढापे वर‎ अशा प्रकारे बसविण्यात आल्याने‎ नागरिकांना जाण्यासाठी मार्गच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राहिला नाही. नागरिकांनी सिडको‎ विभागातील ड्रेनेज विभागाच्या‎ अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मात्र, त्यांनी नेहमीप्रमाणे‎ उडवाउडवीची उत्तरे देत काम‎ करण्याचे टाळले.‎

‎रस्त्याने येण्या-जाण्यास अडचणी
‎रस्त्याच्या वर ड्रेनेजचे ढापे टाकल्याने रस्त्याने जात‎असताना त्यावरून पडून नागरिक जखमी होत आहेत.‎रस्त्याच्या समांतर ड्रेनेज ढापे असणे गरजेचे आहे.‎- स्वप्नील ठोंबरे, स्थानिक रहिवासी‎‎

बातम्या आणखी आहेत...