आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक:शिवरेत विधवेच्या तोंडाला काळे फासत चपलांचा हार घालून काढली धिंड, हा प्रकार अंधश्रद्धेतूनच : अंनिस

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड तालुक्यातील शिवरे येथे विधवेच्या तोंडाला काळे फासत चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली हाेती. हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असून जादूटोणा विरोधी कायदा कलम लावण्याची मागणी अंनिसचे सचिव डॉ. ठकसेन गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली. तशा मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह वडनेरभैरव पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले अाहे.

पतीच्या निधनानंतर महिलेचे सासरच्या लोकांशी वाद झाले होते. पतीच्या दशक्रिया विधीवेळी तिची धिंड काढण्यात आली. या घटनेत गुन्हा दाखल होत नव्हता. महाराष्ट्र अंनिसने हस्तक्षेप केला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामार्फत पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांना गुन्हा नोंदवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गुन्हा दाखल झाला. मात्र, या घटनेमागे अंधश्रद्धा असावी अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. ती शक्यता खरी ठरली. या महिलेने आपल्या फिर्यादीत तसे म्हटलेही आहे. घटनेवेळी आरोपींनी असे म्हटले आहे की हिच्या अंगात देवी आली, तिची पूजा करा, तिची मिरवणूक काढा. हे कृत्य जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे म्हणून त्या कायद्याचे कलम लावावेत, अशी विनंती डाॅ. गोराणे व चांदगुडे यांनी केली आहे. जादुटोणा विरोधी कलम लावण्याची मागणी

बातम्या आणखी आहेत...