आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 लाखांचे दागिने लंपास:शुभमंगलमध्ये ‘सावधान...’वऱ्हाडी टाेळीचा दागिन्यांवर डाेळा

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचा छान उत्साह असताे... महिलांच्या दागिन्यांचा साजशृंगार एकिकडे सुरू असताे. हळदीला हे दागिने, लग्नाला ते दागिने असं सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे ते वेगवेगळेही ठेवलेले असतात. मात्र त्या विधीच्या वेळी महिला ते दागिने बघायला जातात तर दागिनेच नसतात किंवा जेवणाच्या वेळी पर्सच गायब हाेण्याचे प्रकार लग्नांमध्ये वाढल्याने आता शुभमंगलमध्ये सावधान राहण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. वऱ्हाडी टाेळी कार्यरत असल्याचा संशयही पाेलिसांनी व्यक्त केला आहे.

शहरात दोन ठिकाणच्या विवाहात या टोळीने लग्न दोन महिलांची दागिने असलेली पर्स चोरी करत १० लाखांचे दागिने लंपास केले. औरंगाबादरोड आणि हनुमानवाडी पं‌चवटी येथे दोन प्रकार उघडकीस आले. आडगाव, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि विजया कुलथे रा. वृंदावन नगरी हिरावाडी पंचवटी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचवटी परिसरातील हनुमानवाडी येथे लग्न समारंभाकरीता गेल्या होत्या. लग्न समारंभ आटोपल्यानंतर जेवन करण्यासाठी त्या जेवण व्यवस्था असलेल्या ठिकाणी आल्या. ५ लाख ५० हजारांचे दागिने असलेली पर्स खुर्चीवर ठेवून कुलथे जेवनाची थाळी आणन्याकरीता गेल्या थाळी घेऊन आल्यानंतर खुर्चीवर पर्स नसल्याचे त्यांचा लक्षात आले. पंचवटी पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी मंगलकार्यालयात सीसीटिव्हीची तपासणी केली मात्र काही मिळून आले. लग्न समारंभात असेल्या व्हिडीअोग्राफरने केलेली शुटींगची तपासणी केली जात असून यामध्ये काही अनोळखी इसम कार्यालयात वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे. संशयित वधु अथवा वर पक्षाचे नातेवाईक आहेत का याची माहिती घेतली जात आहे.

औरंगाबादरोडवर भावाच्या लग्नात पोलिस बहिणीची पर्स चोरली. कल्याणी गाडे या मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. भावाच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न समारंभ आटोपल्या नंतर आई आणि मावशी सोबत जेवण करण्यास गेल्या असता पर्स खुर्चीवर ठेवली होती. जेवणाची थाळी घेण्यास गेल्या असता ५ लाखांचे दागिने असलेली पर्स चोरी केली.

बातम्या आणखी आहेत...