आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप व्यक्त:सिडकाेमध्ये विजेच्या उच्च दाबामुळे उपकरणे जळाली; नागरिकांना झळ

सिडको25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव नागरिकांना अनेकवेळा येत असतो, असाच प्रकार पवननगर, राजरत्ननगर भागात घडला. उच्च विद्युत दाबाने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, मोबाइल, केबल सेट बॉक्स जळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.सिडकोतील जुना प्रभाग २९ मध्ये मर्चंट बँकेच्या पाठीमागील परिसरात महावितरणचा विद्युत ट्रान्सफाॅर्मर आहे.

रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन मोठा जाळ निघाला. यावेळी संपूर्ण परिसरात उच्च विजेचा दाब वाढून वीजपुरवठा खंडित झाला. अनेक नागरिकांच्या घरातही मोठा आवाज झाला. घरांमधील टीव्ही, फ्रीज, काॅम्प्युटर, विजेची मोटर, फॅन, एलईडी लाईट यांसह विविध विद्युत उपकरणे बंद पडली होती. मंगेश निकुंभ, वीरेंद्र त्रिवेदी, मघुकर खैरनार, लक्ष्मण देवळे, सचिन वाघमारे, संजयकुमार बैरागी, प्रदीप भोळे, शरद मोरे, सूर्यवंशी, महाले आदी नागरिकांच्या घरातील उपकरणांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

धूर निघताच आवाज
घरातील सर्व विजेच्या उपकरणांमधून धूर निघाला. आमच्या घरातील विजेच्या सर्व उपकरणांमधून धूर निघाला. सुदैवाने घरात असल्याने आग लागली नाही. सर्वच वस्तू निकामी झाल्या आहेत. वीज महामंडळाने नुकसानभरपाई द्यावी. - मंगेश निकुंभ, निवासी

बातम्या आणखी आहेत...