आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयांतर्गत घरपट्टी व पाणीपट्टी मिळकतधारकांकडे सुमारे ४६ काेटींची थकबाकी असून मार्च अखेरपर्यंत थकबाकी भरण्याचे उद्दिष्ट आहे. मनपाने धडक वसुली मोहीम हाती घेऊन बड्या थकबाकीदारांना स्मरणपत्र व मालमत्ता जप्तीपूर्वीची नोटीस देण्यात येऊनही कर न भरणाऱ्यांमध्ये पाणीबिल न भरणाऱ्या १५० हून अधिक घर व व्यावसायिकांची नळजोडणी खंडित करण्यात आली आहे.
मनपाच्या सिडको विभागीय कार्यालाकडे मागील व चालू वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण ८३ कोटी ६ लाख ५८ हजारांची थकबाकी आहे. यामध्ये मनपाने ही थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र पथकाद्वारे माेहीम हाती घेतली आहे. स्मरणपत्र, नोटिसा देऊनही पाणी बिलापोटी ४३ कोटी ३३ लाख ३५ हजारांची थकबाकी कायम आहे.
एकूण ८३ काेटी ६ लाखांच्या थकबाकीपैकी मनपाने राबविलेल्या माेहिमेमुळे घरपट्टीची २७ काेटी ३२ लाख ४७ हजार तर पाणीपट्टीचे १० कोटी १५ लाख अशी एकूण ३८ काेटींची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये बड्या पाणीपट्टी थकलेल्यानंा घरमालकांना वारंवार नाेटिस देउनही ते कर भरत नसल्याने अखेरीस त्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
सिडकाे विभागात सव्वा लाख मिळकतधारक : सिडको विभागीय कार्यालयांतर्गत घरपट्टीच्या एकूण १ लाख १४ हजार ४७२ मिळकतधारक आहेत. यामध्ये घर, दुकान, सरकारी कार्यालये व इमारतींचा समावेश आहे. यातील १ लाखांहून अधिक थकबाकीदारांच्या मिळकतींसमोर मनपाने ढोल बजाव मोहीम राबवली. मात्र, त्याचा फारसा उपयोग न झाल्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारवाईला सुरुवात झाली आहे. विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, निरीक्षक अंबादास विधाते, आनंद जाधव, संतोष गायकवाड, राजेंद्र मौले, राजू मोरे यांनी कारवाईची माेहिम राबविली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.