आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:अत्यल्प प्रतिसाद केंद्राने बूस्टर डाेस माेफत करूनही लसीकरणाकडे नागरिकांची पाठ

सचिन जैन | नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आजमितीला ५९८ तर शहरात ३२२ काेराेनाचे सक्रीय रुग्ण आहेत. अशी परिस्थिती असताना आणि १५ जुलैपासून शासनाने बूस्टर डाेस माेफत केला असूनही गेल्या १५ दिवसांत केवळ ३६२७३ म्हणजेच दाेन डाेस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येच्या फक्त ३ टक्केच नागरिकांनी बूस्टर डाेस घेतला आहे. बूस्टर डाेस देण्यासाठी महापालिकेने सहा केंद्रही सज्ज ठेवले आहेत. मात्र या केंद्रांकडेही नागरिकांनी पाठ फिरविल्याचे ‘दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपाेर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत हजाराेंच्या संख्येने काेराेनाबाधित रुग्ण आढळून आल्याने गंंभीर परिस्थिती निर्माण झाली हाेती. काेराेनाचा धाेका व शासनाकडून लसीकरणाबाबत करण्यात आलेली जनजागृती यामुळे काही महिन्यांपूर्वी शहरातील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा हाेत्या. मात्र आता काेराेनाची परिस्थिती नियंत्रणात येताच नागरिकांनी डाेस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. अनेकांनी तर दुसरा डाेसही घेतलेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट हाेते आहे. पालिका क्षेत्रात लसीकरणाचा पहिला डाेस १४ लाख १३ हजार ४१६ तर दुसरा डाेस ११ लाख ३७ हजार ५५५ नागरिकांनी घेेतला आहे. काेराेनाचा संभाव्य धाेका लक्षात घेता केंद्र शासनाच्या वतीने १५ जुलैपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डाेस माेफत देण्याचे जाहीर केले. मात्र सध्या काेराेनाचे घटलेले रुग्ण, नियंत्रणात असलेली परिस्थिती यामुळे बूस्टर डाेस घेण्याबाबत नागरिकांची उदासीनता दिसत आहे. परिणामी पालिका हद्दीतील लसीकरण केंद्रावर शुकशुकाट पसरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत एक लाख १३ हजार ३५३ नागरिकांची बूस्टर डाेस घेतला आहे. नागरिकांनी बूस्टर डाेस घ्यावा यासाठी साेशल माध्यमासह पाेस्टरच्या माध्यमातून पालिकेद्वारे प्रबाेधन करण्यात येणार आहे.

बूस्टर डाेस मिळणारे केंद्र नागरिकांअभावी ओस
देशामध्ये काेराेनबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांसाठी बूस्टर डाेस उपलब्ध झाला हाेता. सुरुवातीला यासाठी रुग्णालयांमध्ये पैसे आकारले जात हाेते. त्यामुळे बूस्टर डाेस घेण्याला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद हाेता. बूस्टर डाेसची किंमत परवडत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र शासनाने १५ जुलैपासून देशभरात सर्वांसाठी बूस्टर डाेस माेफत देण्याची व्यवस्था केली. मात्र त्याकडेही नागरिकांची पाठच फिरवलेली आहे.

लसीकरणामुळे होतोय ओपीडीवर परिणाम
लसीकरण वा बूस्टर डाेस देण्यासाठी पालिकेच्या वतीने आराेग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, दुसरीकडे हे कर्मचारी उपलब्ध हाेत नसल्याने पालिकेच्या रुग्णालयातील ओपीडीवर परिणाम हाेत आहे. अनेक रुग्णांना यामुळे पालिकेच्या रुग्णालयात प्रतीक्षा करावी लागत असल्याने पालिकेने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...