आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • In The CIDCO Area Of Nashak, The Drainage Overflowed In The Upendra Nagar Area; Bad Smell In The Area Is A Problem In The Area With More Than 20000 Population, Endangering The Health Of The Citizens

नाशिकमधील सिडको परिसरात दुर्गंधी:उपेंद्र नगर भागात ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर; हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्रतिनिधी | सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील उपेंद्र नगर येथे अंबड लिंक रोडवर रहदारीच्या मुख्य रस्त्यावर मागील दोन ते तीन महिन्यापासून ड्रेनेज तुंबून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. याबाबत महापालिकेच्या ड्रेनेज विभागाला वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात साधारणता पंधरा ते वीस हजारांमध्ये लोकसंख्या वास्तव्यास आहे.

उपेंद्र नगर येथे अंबड लिंक रोडवर मागील तीन महिन्यापासून ड्रेनेज तुंबून हे संपूर्ण पाणी रस्त्यावर, दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दररोज वाहत असते. याची प्रचंड दुर्गंधी येऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शिवाय यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. येथील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र ड्रेनेज विभागाला येथे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही की काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात सर्वत्र महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवली जात असताना देखील या भरण्याची समस्येकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष न गेल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या गटारीचे पाणी रस्त्यावर हात असल्याने दुर्गंधी बरोबरच डासांचा प्रादुर्भाव होऊन परिसरामध्ये डेंगू चे 50 अधिक रुग्ण महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ड्रेनेज विभागाच्या सर्वाधिक तक्रारी

सिडकोतील ड्रेनेज विभाग सुस्त झाला की काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सिडको विभागात दररोज अनेक ठिकाणी नाले, ड्रेनेज तुंबणे असे प्रकार घडत आहे. नाल्यांची स्वच्छता व साफसफाई नियमित होत नसल्याने असे प्रकार घडत आहे. कामचुकार पणा करणाऱ्या ड्रेनज विभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने वेळीच या तक्रारीची दखल घेतली न गेल्यास परिसरातील रहिवासी कुटुंबीयांचा महापालिकेच्या मागे कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...