आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:अखेर ओझरला ग्रामपंचायत निवडणूकच होणार, इच्छुक उमेदवारांचा हिरमोड; नगरपरिषद जाहीर परंतु मुहूर्त कधी लागणार ?

ओझरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओझरकरांना अजून नगरपरिषदेची प्रतिक्षा करावी लागणार

ओझर सह राज्यातील 12 ग्रामपालिका यांचे रूपांतर नगर परिषदेत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पण, राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने ग्रामपालिकेच्या निवडणुका न घेता त्या पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. तसेच, माजी आमदार अनिल कदम यांनीही मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आता होणाऱ्या निवडणूकीना दि.२२ रोजी सुनावणीस स्थगिती देण्यास नकार दिल्याने ओझरकरांना ग्रामपंचायत निवडणूकिला सामोरे जावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने जाहीर केला आहे. या ग्रामपालिकेला पैकी सोबत विवरण पत्रातील ग्रामपंचायतीं बाबत नगरपंचायत नगरपरिषद रूपांतर यांची कारवाई नगर विकास विभागात प्रक्रिया सुरू आहे. आपल्या कार्यक्रमानुसार या आता निवडणुका झाल्या तर त्यानंतर विभागाने रूपांतराची कारवाई केल्यावर या ग्रामपंचायतींचे अस्तित्वच संपुष्टात येईल व पुन्हा तेथे नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणाच्या निवडणुका घ्याव्या लागतील. या निवडणुकांवर शासनाचा दुहेरी खर्च होणार आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन नगरविकास खात्याने या तेरा ग्राम पालिकांच्या निवडणुका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात याव्या अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

नाशिक जिल्ह्यात एकमेव नगरपरिषद म्हणून जाहीर झालेल्या ओझर ग्रामपलिकेची घोषित झालेली निवडणूक न घेता थेट नगरपरिषदची घ्यावी यासाठी अनिल कदम आग्रही असून प्रक्रियेत कुठे आडकाठी नको म्हणून याचिका देखील दाखल केली आहे.असे त्याच्याकडून सांगण्यात आले होते.परंतु उच्च न्यायालयाने स्थगिती घेण्यास नकार दिल्याने आता इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूकिला सामोरे जावे लागणार आहे.

मुहूर्त कधी लागणार...?

गेल्याच सहा डिसेंबर रोजी ओझर नगर परिषदेचा आदेश शासनस्तरावरून वरून निघाला आणि मागील आठवड्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला व मंगळवारी दिनांक 22 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने नगर विकास खात्याने ग्रामपंचायत निवडणूक तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावे असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले होते तसेच माजी आमदार अनिल कदम यांनीही ग्रामपंचायत निवडणूकीला स्थगिती देऊन नगर परिषद निवडणूक घ्यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती परंतू स्थगिती न दिल्याने ओझरला ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे असे जाहीर झाले आहे.

असाच प्रकार बारा वर्षांपूर्वी पिंपळगाव बसवंत नगरपरिषद बाबत झाला होता मात्र अद्यापही नगरपरिषद झालेली नाही.ओझर बाबतही आदेश निघाला; मुहूर्त कधी लागणार...? हे मात्र अनिश्चित झाले आहे

नगरपरिषदेत रूपांतरीत होणा-या ग्रामपालिका

ओझर(नाशिक),घुग्घूस(चंद्रपुर),नातेपुते,महाळुंग/श्रीपुर,अकलूज,वैराग(सोलापूर),नशिराबाद(जळगाव),तिर्थपुरी(जालना),मंचर,माळेगाव,औताडे हांडेवाडी,शेवाळेवाडी,वडाचीवाडी(पुणे) लेहगाव, शिवर(अमरावती)

बातम्या आणखी आहेत...