आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य‎ तपासणी:97  हजार बालकांच्या तपासणीत‎ तब्बल 2500 बालके व्याधिग्रस्त‎

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎स्वच्छ आरोग्यदायी आणि स्मार्ट‎ नाशिक अशी ओळख असलेल्या‎ शहरांमध्ये ‘जागरूक पालक, सुदृढ‎ बालक’ अभियानांतर्गत पहिल्या‎ टप्प्यात ९७ हजार इतके उद्दिष्ट‎ असताना झालेल्या आरोग्य‎ तपासणीत अंगणवाडीपासून तर‎ दहावी पर्यंत विविध इयत्तेत शिक्षण‎ घेणारी २५२४ व्याधिग्रस्त बालके‎ आढळली आहेत. त्यापैकी १६४६‎ बालकांवर तात्पुरत्या स्वरुपाचे‎ औषधोपचार करण्यात आले आहे.‎ तर ८७८ बालकांना पुढील‎ उपचारासाठी रुग्णालयात पाठवले‎ जाणार आहे. दरम्यान, जवळपास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चार लाख बालकांची तपासणी‎ बाकी असून व्याधिग्रस्त बालकांचा‎ आकडा वाढण्याची शक्यता आहे.‎

९ फेब्रुवारीपासून शहरात ‘जागरूक‎ पालक, सुदृढ बालक’ अभियान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राबविण्यात येत असून या‎ अभियानात अठरा वर्षे‎ वयोगटांपर्यंतच्या सर्व बालक आणि‎ किशोरवयीन मुला-मुलींची‎ सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार आहे.

अभियान महत्त्वाचे‎
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार‎ महापालिकेच्या माध्यमातून शहरात‎ जागरूक पालक, सुदृढ बालक‎ अभियान राबविण्यात येत आहे.‎ त्वरित आजाराचे निदान व्हावे व‎ वेळेत उपचार व्हावे यासाठी‎ अभियान राबवले जात आहे. - डॉ.‎ बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय‎ अधीक्षक, मनपा‎

बातम्या आणखी आहेत...