आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी रवाना:पहिल्या उड्डाणात दिल्लीहून आले ९१  तर नाशिकहून ७२ प्रवासी रवाना

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षानंतर नाशिककरांनी दिल्लीकडे थेट उड्डाण केले. गुरुवारी (दि. ४) स्पाइस जेटने १८० आसन क्षमतेचे विमान उपलब्ध केले आहे. पहिल्याच दिवशी दिल्लीहून नाशिकला ९१ प्रवासी आले तर नाशिकहून दिल्लीकडे ७२ प्रवासी रवाना झाले. विशेष म्हणजे, यापूर्वीची अहमदाबादमार्गे दिल्ली अशी हाॅपिंग फ्लाइटही आहे. मात्र आता या नव्या फ्लासटमुळे नाशिककरांना दिल्लीकरिता दाेन फ्लाइटस‌् उपलब्ध झाल्या आहेत.

९ आॅगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककरांना दिवसभरात दिल्लीत पोहोचून कामे उरकणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, १० ऑगस्टपासून ही वेळ आणखी सव्वा तास लवकर करण्यात आल्याने सकाळी १०.४५ वाजताच दिल्लीत पाेहाेचणे शक्य हाेणार आहे. उडाण याेजनेंतर्गत ही सेवा असल्याने केवळ ५१०० रुपयांपासून तिकिट बुकिंग शक्य आहे. तीन वर्षांपूर्वी जेट एअरवेजकडून नाशिक-दिल्ली ही विमानसेवा सुरू हाेती जी कंपनी बंद पडल्याने अचानक बंद झाली हाेती. यासेवेला शंभर टक्के प्रतिसाद प्रवाश्यांकडून मिळत हाेता.

या शहरांसाठी विमानसेवा नाशिकहून दिल्ली (दाेन फ्लाइट), अहमदाबाद, हैदराबाद (कनेक्ट- तिरूपती), पुणे, बेळगाव या शहरांसाठी सेवा सुरू आहे.

१० ऑगस्टपासून वेळापत्रक
दिल्लीहून स. ६.३५ वा. टेकऑफ
नाशिक स. ८.३० वाजता लँडिंग
नाशिकहून स. ९.०० वा. टेकऑफ
दिल्लीत स. १०.४५ वा. लँडिंग

बातम्या आणखी आहेत...