आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीकडे उड्डाण:पहिल्या उड्डाणात दिल्लीहून 91 तर नाशिकहून 72 प्रवासी

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांनंतर नाशिककरांनी दिल्लीकडे थेट उड्डाण केले. गुरुवारी (दि. ४) स्पाइस जेटने १८० आसनक्षमतेचे विमान उपलब्ध केले आहे. पहिल्याच दिवशी दिल्लीहून नाशिकला ९१ प्रवासी आले तर नाशिकहून दिल्लीकडे ७२ प्रवासी रवाना झाले. विशेष म्हणजे, यापूर्वीची अहमदाबादमार्गे दिल्ली अशी हाॅपिंग फ्लाइटही आहे. मात्र आता या नव्या फ्लाइटमुळे नाशिककरांना दिल्लीकरिता दाेन फ्लाइट‌्स‌ उपलब्ध झाल्या आहेत.

९ ऑगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककरांना दिवसभरात दिल्लीत पोहोचून कामे उरकणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, १० ऑगस्टपासून ही वेळ आणखी सव्वा तास लवकर करण्यात आल्याने सकाळी १०.४५ वाजताच दिल्लीत पाेहाेचणे शक्य हाेणार आहे. उडान याेजनेंतर्गत ही सेवा असल्याने केवळ ५१०० रुपयांपासून तिकीट बुकिंग शक्य आहे. तीन वर्षांपूर्वी जेट एअरवेजकडून नाशिक-दिल्ली ही विमानसेवा सुरू हाेती जी कंपनी बंद पडल्याने अचानक बंद झाली हाेती. या सेवेला शंभर टक्के प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत हाेता.

१० ऑगस्टपासून वेळापत्रक असे दिल्लीहून स. ६.३५ वाजता टेकऑफ नाशिक स. ८.३० वाजता लँडिंग नाशिकहून स. ९.०० वाजता टेकऑफ दिल्लीत स. १०.४५ वाजता लँडिंग

बातम्या आणखी आहेत...