आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Nashik
 • In The Meeting Of The Nashik Ganesh Mandals, The Decision Was Made To Hold The Ganesh Visarjan Procession At Eleven O'clock In The Morning

नाशिक गणेश मंडळांच्या बैैठकीत निर्णय:विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजताच काढण्याचा निर्णय

नाशिकएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीतील सर्व मंडळांना पांरपारिक मिरवणूक मार्गावरुन जात वेळेत बाप्पांचे विसर्जन करता यावे यासाठी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वाजता काढण्याचा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी (दि. 6) पाेलिस प्रशासन व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा संयुक्त बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे 11 वाजता मिरवणूक सुरु झाल्याने प्रत्येक गणेश मंडळाला प्रमुख चाैकांमध्ये थांबवण्यसाठी 20 मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही व दुसऱ्या मंडळाला अडथळा निर्माण झाला तर त्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे.

काेराेनाचे निर्बंध हटल्याने यंदा गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक दणक्यात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि. 6) पाेलिस प्रशासन व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची भद्रकाली पाेलिस ठाण्यात बैठक पार पडली. यावेळी पांरपारिक वाकडी बारव येथून प्रारंभ हाेणाऱ्या मिरवणुकीसाठी 2019 प्रमाणेच गणेश मंडळांना क्रमांक देण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.

मात्र यावर काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला. मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या मंडळ हे ठिकठिकाणी खूप वेळ थांबतात. मात्र याचा परिणाम शेवटी क्रमांक असलेल्या मडंळावर हाेताे. शेवटच्या मंडळांना रात्री एमजीराेड येथे येण्यासाठी रात्रीचे बारा वाजता. परिणामी मिरवणूक अर्ध्यावरच साेडावी लागत असल्याने नंबर चिठ्ठी काढून देण्याची मागणी केली.यामुळे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला हाेता.मानाचे गणपती वगळून चिठ्ठी काढावी अशी देखील मागणी झाल्याने तब्बल दाेन -अडीत तास हा वाद रंगला.

अखेरीस मिरवणूक सकाळी 11 वाजता काेणत्याही राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांची वाट न पाहता मिरवणुकीला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.यावेळी गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, दिनेश कमाेद, गणेश माेरे गणेश बर्वे आदीसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

तर त्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

गणेश विर्सजन मिरवणुकीच्या दृष्टीने प्रमुख 17 चाैकात प्रत्येक गणेश मंडळांना केवळ 20 मिनिटे थांबण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आला.दाेन मंडळांमध्ये जास्त अंतर न हाेवू देणे ही त्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असेल.तर मंडळांने नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहे.

मंडळांच्या बैैठकीत हे निर्णय घेण्यात आले

 • मिरवणुकीला सकाळी 11 वाजता प्रारंभ हाेणार
 • गुलालाचा वापर करु नये
 • स्वागत समितीची व्यासपीठ तीन ते चार फुट असावे. स्वागतासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंडकांकडे जावे.
 • दाेन मंडळामध्ये जास्त अंतर निर्माण हाेवू नयेयासाठी स्वंयसेवक नेमावे
 • नियमांचे पालन न केल्यास गुन्हे दाखल केले जाणार
बातम्या आणखी आहेत...